ताज्या घडामोडी

आरक्षणासाठी गरज पडल्यास सरकारच्या विरोधात : आमदार सुहासआण्णा कांदे 

नांदगावला सकल मराठा समाजातर्फे जुन्या तहसीलजवळील त्रिफुलीवर रास्ता रोको आंदोलन

गर्जा महाराष्ट्र24 न्यूज वृत्तसेवा
 
नांदगांव ता.०९ मराठा समाजाच्या आंदोलकांवर करण्यात आलेल्या पोलिसांच्या लाठीमाराच्या निषेधार्थ नांदगाव ला गुरुवारी (ता.७) येथे सकल मराठा समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन झाले.यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.आमदार सुहासआण्णा कांदे,माजी आमदार संजय पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे,आम आदमी पक्षाचे जिल्हा महामंत्री विशाल वडघुले विशाल वडघुले,माजी सभापती तेज कवडे,नीलेश चव्हाण,विजय पाटील,राजाभाऊ जगताप,राजाभाऊ देशमुख,संतोष गुप्ता,संजय आहेर,संगीता सोनवणे आदींनी आंदोलनात सहभागी होत सरकारविरोधात घोषणाबाजी करीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

मी सरकारच्या विरोधात भूमिका घेईन. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिदि यांना आरक्षणाची जाणीव असल्याने ते नक्कीच आरक्षण मिळवून देतील.मी मराठा समाजाच्या आरक्षण मुदयाच्या बाजूने असून,तुम्ही सांगाल त्या-त्या वेळी तुमच्या सोबत राहील,असेही आश्वासन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी यावेळी दिले.

यावेळी छायाचित्रकार विकी कदम यांचे भाषण अनेकांना भावले. आरक्षणाचा आपल्याला कसा फटका बसला हे सांगताना त्यांना रडू कोसळले.आम आदमी पक्षाचे जिल्हा महामंत्री विशाल वडघुले, ज्येष्ठ शेतकरी निवृत्ती खालकर,राहुल दरगुडे व श्री.राऊत यांनी लाठीमाराच्या निषेधार्थ मुंडण करून निषेध नोंदविला.

तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना निवेदन देण्यात.आले.आंदोलनात आमदार सुहासआण्णा कांदे,माजी आमदार संजय पवार,अँड.अनिल आहेर,ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे माजी सभापती विलासराव आहेर,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट),तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे’मविप्र’चे संचालक अमित पाटील(राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट),तालुकाध्यक्ष विजय पाटील,माजी नगराध्यक्ष राजेश कवडे,बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील,माजी सभापती तेज कवडे,नंदू पाटील,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश बोरसे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किरण देवरे,माजी नगराध्यक्ष चेतन पाटील,समाधान पाटील तसेच मराठा समाजासह अन्य समाजघटकातील समाजबांधवाही सहभागी झाले होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.