ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकशाही वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांच्यावरील गुन्हे त्वरित मागे घ्या,नांदगाव तालुका सुतार समाज संघटनेची मागणी

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगांव ता.१३ सुतार समाजाचे पत्रकारीतेतील लोकशाही वृत्तवाहिनी चे मुख्य संपादक कमलेश सुतार यांच्या वरती जो गुन्हा दाखल केला आहे. त्या कृतीचा नांदगाव तालुका सुतार समाजाचे वतीने जाहिर निषेध व्यक्त करून संपादक कमलेश सुतार यांच्यावरील गुन्हे शासनाने तात्काळ मागे घ्यावेत असे निवेदन नांदगांव तालुका सुतार समाजाच्या वतीने तहसिलदार डॉ सिध्दार्थकुमार मोरे यांना मंगळवारी ता.१२ रोजी देण्यात आले.

तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकशाही’ वृत्त वाहिनीने भाजपा नेते किरीट सोमैय्या यांचे वृत्त कायद्याच्या चौकटीत राहून प्रक्षेपित केले होते.व तसा खुलासा देखील संपादकांनी आपल्या बातमी आधी केला होता.सदर प्रकरण हे विधी मंडळापर्यंत गेलेले असता विरोधी पक्षाने याबबाबत सखोल चकशीची मागणी केली आहे ते प्रत्युत्तर देताना मा.गृहमंत्री,मा.मुख्यमंत्री यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते.परंतु याबाबत चौकशी पूर्ण न करता लोकशाही वृत्तवाहिनीचे कमलेश सुतार (मुख्य संपादक ) यांचे वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तो अतिशय अन्यायकारक व दडपशाही करणारा आहे. भारतीय लोकशाहीतील चौथा स्तंभ संबोधल्या जाणार्‍या पत्रकारितेवर अशा प्रकारे गुन्हे दाखल करून सरकार कडून दडपशाही केली जात आहे
राज्यातील प्रमुख पत्रकारांची जर अशी परिस्थिती अशी असेल तर सर्वसामान्या जनतेचे काय ? अशी भीती आम्हा सामान्य नागरिकांना आहे. त्या मुळे ’लोकशाही वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात सुतार समाज्याच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. व याच्या परिणामाची संपूर्ण जबाबदारी हि महाराष्ट्र सरकारची असेन असे तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर संजय कदम अध्यक्ष सुतार समाज,नंदूलाल आहिरे, डिंगनबर गवळे,मधुकर खैरणार, सुभाष पेंढारकर, दिपक मोरे, कैलास जाधव, निबाजी हिरे, राजेंद्र खैरणार,बाबासाहेब कदम यांच्या सह अनेक समाज बांधव स्वाक्षर्‍या आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.