ताज्या घडामोडी

नांदगावला शासकीय आय. टी.आय मध्ये पीएम.रन फॉर स्किल,पदवीदान दीक्षांत समारंभ उत्साहात साजरा

प्रभू विश्वकर्मा पुजन दिन व देशाचे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने पीएम " रन फॉर स्किल" व प्रशिक्षणार्थीसाठी "पदवीदान सोहळ्या" चे आयोजन

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नांदगाव ता.१८ प्रभू विश्वकर्मा पुजन दिन व देशाचे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने नांदगाव शासकीय आय.टी.आय मध्ये पीएम
” रन फॉर स्किल” व प्रशिक्षणार्थीसाठी “पदवीदान सोहळ्या” चे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नांदगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर,भाजपा जिल्हाध्यक्ष पंकज खताळ, आधार बहु उद्देशीय संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या अड विद्या.कसबे लोको पायलट क्रू लॉबी शंकर धनवटे नांदगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था च्या प्राचार्या श्रीमती अपर्णा कुलकर्णी यांनी सरस्वती पूजन व प्रभू विश्वकर्मा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात झाली. उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे यांनी भूषविले.नांदगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्तीर्ण झालेल्या विविध व्यवसायातील प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला तसेच पीएम.स्किल.रन मध्ये प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षीस रकमेचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला.


या कार्यक्रमाप्रसंगी शंकर धनवटे,विद्या कसबे,नितीन खंडागळे,पंकज खताळ यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमा प्रसंगी संस्थेतील एम.डी.निकुंभ गटनिदेशक सह संस्थेतील सर्व कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशश्वी करण्या साठी मेहनत घेतली.महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.सूत्रसंचालन श्री पी.डी.राठोड श्री.पी.एस.गायकवाड यांनी केले व श्री.एस.टी.शिंदे यांनी आभार मानले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.