ताज्या घडामोडी

नांदगाव तालुक्यातील बाणगाव बुद्रुक गाव डिजिटल साक्षर म्हणून घोषित

डिजिटल बँकिंगद्वारे होतात गावचे १०० टक्के व्यवहार

गर्जा महाराष्ट्र24न्यूजवृतसेवा

नांदगांव ता. १७: महाराष्ट्र ग्रामीण बँक नांदगाव शाखा नांदगाव तर्फे महाग्रामीण डिजिटल साक्षर अभियान राबविले या अभियानात नांदगाव तालुक्यातील बाणगाव बुद्रुक हे गाव १०० टक्के डिजिटल बँकिंग व प्रधानमंत्री सामाजिक सुरक्षा.योजेनेत पात्र लाभर्थ्यानी शंभर टक्के सहभागी नोंदवला आहे .
नांदगाव तालुक्यातील बाणगाव बुद्रुक हे गाव महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे दत्तक गाव असून सदर गावातील संपूर्ण गावकऱ्यांचे बँक खाते हे महाराष्ट्र ग्रामिन बँकेत असून सर्व खातेधारक हे डिजिटल व्यवहार करतात.जसे की आधार लिंक द्वारे अथवा मोबाइल बँकिंग द्वारे,ऍपद्वारे,यूपीआय पेमेंट द्वारे.तसेच गावातिल युवक, महिला वर्गही फोन पे, गूगल पे मोबाइल बँकिंग द्वारे व्यवहार करतात. तसेच गावात एटीएम मशीन व बीसी पॉइंट द्वारे सर्व गावकरी यांना सुविधा दिलेली आहे.सदर कार्यक्रम हा महाराष्ट्र ग्रामीण बँक व बाणगाव बुद्रुक ग्रामपंचयात यांच्या संयुक्त सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय गाव बुद्रुक येथे संपन्न झाला.महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे चेअरमन मिलिंद घारड यांच्या १०० टक्के डिजिटल व्हिलेज” संकल्पनेतून व नाशिक क्षेत्रीय व्यवस्थापक श्री.एस.जे.पाटील साहेब यांच्या योग्य मार्गदर्शनाने नांदगाव शाखेने तालुक्यातील बाणगाव बुद्रुक हे गाव १०० टक्के डिजिटल व्हिलेज म्हणुन घोषित केले व बँकेचे BC समाधान देवकर यांच्या विशेष सहकार्यातून मेळावा आयोजित करण्यात आला.होता या कार्यक्रमास महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे नांदगाव शाखा प्रमुख जयंत अमृतकर यांनी प्रस्तावना केली व आपले मनोगत व्यक्त केले.तसेच आजच्या मेळाव्यात सर्वांत खास आकर्षण म्हणजे नाशिक क्षेत्रीय व्यवस्थापक.एस.जे.पाटील यांनी गावकऱ्यांशी साधलेला अप्रतिम संवाद व संबोधन.अगदी सोप्या व सहज समजेल अशा पद्धतीने सरांनी गावकऱ्यांशी संवाद साधला,सकारात्मक व ऊर्जावान पद्धतीने मार्गदर्शन केले.जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांचे अध्यक्षीय मनोगत झाले.या प्रसंगी,नाशिक क्षेत्रीयव्यवस्थापक.एस.जे.पाटील,नांदगाव शाखा व्यवस्थापक जयंत अमृतकर,अड सचिन साळवे,बीड रिजन मध्ये वित्तिय साक्षरतेची धुरा सांभाळणारे.राहुल ठाकूर (माजी नौदल सैनिक) यांनीही आपल्या खास शैलीत डिजिटल व आर्थिक साक्षरतेचे मार्गदर्शन केले. यावेळी बाणगाव व परिसरातील गावातील खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते

फोटो ओळ –
बाणगाव बुद्रुक – महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे बाणगाव बुद्रुक हे गाव १०० टक्के डिजिटल साक्षर घोषित केल्याप्रसंगी क्षेत्रीय व्यवस्थापक एस.जे.पाटील,जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे,शाखा व्यवस्थापक जयंत अमृतकर बी सी सेन्टर संचालक समाधान देवकर व अधिकारी,खातेदार,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.