ताज्या घडामोडी

नांदगाव महाविद्यालयात हिंदी दिन साजरा

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगव ता १६ येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ.एस.एन.शिंदे होते.हिंदी भाषेतील उज्वल भविष्य हे डॉ. बी.बी धोंगडे हिंदी विभाग प्रमुख यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडले.
प्रमुख वक्ते श्री डी.एम.भिलोरे यांनी हिंदी भाषेचा इतिहास, संविधानाने दिलेला राष्ट्रभाषेचा दर्जा व त्याची प्रक्रिया हिंदी भाषेचे भारत स्वतंत्र होण्यासाठी चे असलेले योगदान अशा विविध विषयावर आपले मनोगत व्यक्त केले .
कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री जी.व्ही.बोरसे यांनी हिंदी भाषेचे महत्व हिंदी साहित्याचे महत्व,विविध प्रकार तसेच शेरोशायरीने विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन तसेच मनोरंजन केले.महाविद्यालयातील कु कल्पेश सोनवणे कु कोमल बोरसे कु अक्षय पानगव्हाणे कु सचिन शिंदे,कु रिना राठोड, कु बाळनाथ शिंदे या विद्यार्थ्यांनी आपले हिंदी विषयाचे प्रेम आपल्या भाषणातून व्यक्त केले.हिंदी सप्ताह निमित्त झालेल्या विविध स्पर्धांमध्ये विजयी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस एन शिंदे,उपप्राचार्य डॉ.एस.ए.मराठे,देवरे आर.टी.तसेच मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस.एन.शिंदे यांनी “हिंदी पढो,आगे बढो,भारत जोडो”असा संदेश देत आपल्या विश्व प्रसिद्ध वसुधैव कुटुम्बकम भावनेने परिपूर्ण संस्कृती,सभ्यता असलेली हिंदी भाषा चा महिमा आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केला.याकार्यक्रमाला शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.महाविद्यालयातील शिक्षक,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक श्री अनिल राठोड यांनी मानले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.