ताज्या घडामोडी

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंचा नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद

आदित्य ठाकरेंच्या समोर दुष्काळी स्थिती मांडताना शेतकरी बांधवांचे अश्रू अनावर;

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा

नाशिक ता.१७ युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ओझर शिर्डी महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील हिवरगाव कोमलवाडी दुष्काळ ग्रस्त शेतकरी बांधवाच्या बांधावर शेतकरी कुटुंबाशी संवाद साधला.यावेळी शेतकरी बांधवांना स्वतः ची दुष्काळी ची व्यस्था मांडताना रडू कोसळले.
सिन्नरचा दुष्काळी परिस्थिती अन् डोळ्यांसमोर उभे पीक जळाले ही व्यथा ऐकून उपस्थित राजकीय नेत्यांची मने हेलावली.आदित्य ठाकरे सारख्या नवख्या नेत्याने कोणते पिक ते त्याला येणारा खर्च प्रत्येक बाबी बारकाइने विचारल्या शेतकरी बांधवांकडून शेतात भारतीय बैठक मांडत जाणून घेतल्या आहे. शेतकरी बांधवांनी शेतात जळालेले सोयाबीन पिकांच्या काढ्या ठाकरे यांना दाखवत,बघा साहेब,हा आहे सिन्नरचा दुष्काळ,सांगा तुम्ही हेक्टरी किती अनुदान पाहिजे? एकरी साडे वीस हजार सोयाबीन पिक उभारणीचा खर्च आहे.माजी आमदार राजाभाऊ वाजे, निफाडचे माजी आमदार अनिल कदम,उपजिल्हा प्रमुख दीपक खुळे,नाशिकचे सुधाकर बडगुजर भारत कोकाटे, यांच्या सह विविध उबाठा गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.