ताज्या घडामोडी

लिटल स्टार इंग्लिश स्कुलमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा संपन्न

विद्यार्थ्यांनी साकारले शाडूचे बाप्पा...

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव ता.१६ नमन एज्युकेशन सोसायटी’ संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव शाळेमध्ये शाडू मातीपासुन गणपती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली.

नमन एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलात पर्यावरणपूरक (शाडू) गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा झाली.संस्थेचे अध्यक्ष संजय बागुल व उपाध्यक्षा सरिता बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली व लिटल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापिका.अनुराधा खांडेकर वरेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली रसायनयुक्त रंगामुळे होणारे प्रदूषण रोखता यावे व पर्यावरण संरक्षणाला स हातभार लावता यावा या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेला विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.शाडूच्या मातीपासून पर्यावरण पूरक गणपती बनवण्याच्या कार्यशाळेत.शाडूच्या मातीपासून पर्यावरण पूरक गणपती कसे तयार करायचे याबाबत शाळेतील चित्रकला शिक्षिका दिपाली खैरनार यांनी कृतीयुक्त मार्गदर्शन केले.


शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्तीमुळे प्रदूषण होत नाही तसेच पर्यावरणाची हानी होत नाही याचे महत्व पटवून दिले.शाडूचा वापर केल्याने पाण्याचे होणारे प्रदूषण व गणपतीच्या मूर्तीची विटंबना आपण टाळू शकतो हाच संदेश सदर कार्यशाळेतून देण्यात आला.स्कुलच्या वतीने विद्यार्थ्यांना शाडूची माती पुरविण्यात आली होती.इको फ्रेंडली गणपती कार्यशाळेत अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आपल्या लाडक्या बाप्पाची आकर्षक सुरेख मूर्ती स्वनिर्मितीचा आनंद लुटला.

फोटो ओळ – नमन एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरणपूरक साडूच्या मातीपासून बनविलेल्या गणेशाच्या मूर्ती

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.