आपला जिल्हा

नांदगाव ला गणेशउत्सव व ईद च्या पाश्र्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न

गणेश विसर्जनासाठी नांदगावला कृत्रिम कुंड

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.१५ आगामी गणेशोत्सवात व ईद उत्सव
मिरवणूकित पारंपरिक वाद्य वाजवावी तसेच गणपती मंडळा सोबत 24 तास स्वयंसेवक नेमवावे,तसेच मंडळांनी वीज वितरण कंपनी कडून अधिकृत कनेक्शन घ्यावे.कार्यकर्तेनी कायद्याच्या चौकटी राहून गणेश उत्सव व ईद (ईद -ए- मिलाद) साजरा करावा,तसेच या कालावधीत सोशल मीडियावर वापरताना काळजी घ्यावी,काही चुकीची माहिती निर्देशात आली तर पोलिसांकशी संपर्क करावा असे आव्हान मनमाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोहेल शेख यांनी केले.आगामी गणेश विसर्जन व महंमद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) आणि सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक शुक्रवारी (ता.१५ ) रोजी नांदगाव पोलीस ठाण्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकी नगरपालिकेचे मुख्यधिकारी विवेक धांडे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की या वर्षी पाऊस कमी आहे,गणपती च्या मोठ्या मूर्तीचे जतन करण्यात येणार असून लहान मूर्तीच्या विसर्जन करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने शिवसस्फूर्ती चौकात कृत्रिम तलाव तयार केला जाणार आहे,ज्या मंडळावर कार्यवाही झाली नाही आशा मंडळांना १० वर्ष परवानगी मिळणार आहे
लहान मूर्तीच्या विसर्जनासाठी पाऊस कमी असल्याने कृत्रिम तलाव तयार केला जाणार असल्याची माहिती दिली. तसेच मिरवणुकीच्या मार्गातील अडथळे दूर करणार असल्याचेही सांगितले.


यावेळी तहसीलदार डॉ सिध्दार्थ मोरे यांनी सांगितले की गणेश मंडळांना प्रशासनाचे सर्व सहकार्य मिळेल यावेळी नांदगाव पोलीस ठाण्यात चे पोलीस निरीक्षक प्रतिमा चोधरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की – जे गणपती मंडळे सामाजिक संदेश देणारे देखावे करतील आशा कामाची पोलीस स्टेशनचे अधिकारी पाहणी करून उत्कृष्ट कार्यक्रम घेणाऱ्या मंडळांना नांदगाव पोलीस ठाण्यातर्फे आदर्श गणेशोत्सव मंडळाला प्रशस्तीपत्र,बक्षीस देऊन गौरविण्यात येईल,मंडळांनी सामाजिक उपक्रम राबाबे,असे आव्हान केले


यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश (बबी ) कवडे म्हणाले की या वर्षी दुष्काळी परिस्थिती असून मंडळांनी,जादा खर्च करू नका,खर्चाच्या बचत मधून भविष्यात पाण्याच्या कामावर खर्च करून सामाजिक बांधिलकी जोपासावी अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी नांदगव तालुका व्यापारी संघटनेचे बाळासाहेब कवडे,प्रा.वाल्मिक जगताप,संदीप जेजुरकर यांनी मनोगत व्यक्त केले

यावेळी तहसीलदार डॉ सिद्धांर्थ मोरे,नांदगाव पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी,नांदगाव नगर परिषदचे मुख्याधिकारी विवेक धांडे,नगरपालिकेचे कर निरक्षीक राहुल कुटे,माजी नगराध्यक्ष राजेश कवडे,पोलिस सहायक निरीक्षक नितिन खंडागऴे,पोलिस उपनिरक्षक मनोज वाघमारे,उपनिरीक्षक संतोष बहाकर,हवालदार राजू मोरे,गोपनीय शाखेचे आंमलदार दत्ता सोनवणे,महाराष्ट्र राज्य विधुत वितरण चे सहायक अभियंता,डी,डी पाटिल,नांदगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश शेऴके,नरेंद्र पाटिल,याकुब शेख वंचित बहुजन आघाड़ी चे वाल्मीक जगताप सामाजिक कार्यकर्त, सिध्दांर्थ पवार मुस्ताक शेख,नासिर शेख़,कपिल,वाल्मिक पवार तेलुरे,कलिम शेख आदी उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.