महाराष्ट्र

नांदगाव तालुक्यात बैल पोळा सण उत्साहात साजरा

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृत्तसेवा

नांदगाव ता.१४ तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बळीराजाने आपले दुःख बाजूला सारून आपल्या सर्जा – राज्याचा पोळ्याचा सण शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला. बैल पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी बँडबाजासह वाजत गाजत आपल्या सर्जा राज्याची शहरातुन मिरवणुका काढल्या.या मिरवणुकीमध्ये शेतकऱ्यासह तरुण शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

.वर्षभर शेतात शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी अपार कष्ट करण्याऱ्या शेतकऱ्यांचा सच्चा मिञ बैल यांना बैलपोळ्याच्या दिवशी गळ्यांत चंगाळी शिंगाना कलर अंगावर कलरने विविध प्रकारची सजावट अंगावर झुली या पध्दतीने पोळ्यानिमित्त सजवुन बैलांची शहरातुन शेतकऱ्यांकडुन मिरवणुका काढण्यात आल्या.महिलांनी पुरण पोळीचा स्वयपाक करुन बैलाची पुजा करुन बैलाना पुरणपोळी खाऊ घालण्यात आली.

वर्षभर शेतातील विविध कामात शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा बैलपोळ्याचा सण साजरा करण्यात येतो. यावर्षी पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील असलेले प्रमुख पिके जळून खाक झाली आहे,त्यामुळे यावर्षी खरीप हंगाम वाया जाऊन उत्पन्नात मोठी घट होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.माञ तरीही बैलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठ्या उत्साहात शेतकऱ्यांनी हा सण साजरा केला आहे.बैलपोळ्या निमित्त या भागात शेतकरी दिवसभर उपाशी राहुन बैलाचा उपहास करतात बैलांना सायंकाळी पुरणपोळीचे जेवण दिल्यानतंरच शेतकरी जेवण करतात.बैल पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी बैलाची सजावट करुन घरी पूरण पोळीचा स्वयपाक करुन सायंकाळी पाच वाजणेच्या सुमारास बैलाची व इतर पशुधनाची विधीवत पुजा करुन बैलाना व इतर पशुधनाला पुरणपोळीचे जेवण दिल्यानतंर शेतकऱ्यांनी जेवण करुण उपवास सोडला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.