महाराष्ट्र

बाणगाव बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहाच्या वातावरणात संपन्न

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृृत्तसेेवा

बाणगाव बुद्रुक ता.०१४ तालुक्यातील बाणगाव बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.
 रविवारी ता.१० रोजी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी  बाणगाव बुद्रुक ची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे मार्गदर्शक जेष्ट नेते बापुसाहेब कवडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी १० वाजता सुरू होऊन सभेच्या विषय पत्रिका नुसार सर्व विषयांवर सर्व संचालक मंडळाची चर्चा होऊन सभेपुढे आलेल्या सर्व विषयांना सर्वानुमते मंजूर करण्यात आली.यावेळी संस्थेचे मार्गदर्शक जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की बाणगांव बुद्रुक विविध कार्य सेवा सोसायटी ची स्थापना १९२६ साली झाली सुरवातिला टाकळी,भौरी,बाणगांव आशी गावे मिळून सोसायटीचे कार्य क्षेत्र होते आता बाणगांव बुद्रुक सोसायटीचे कार्यक्षेत्र स्वतंत्र झाले आहे या सोसायटीने आर्थिक प्रगती केली आहे स्थापने पासून ते आज पर्यंत कर्ज वसूली १००℅ आहे,
संस्थेचे माजी सचिव संजय फणसे यांची बदली झाल्याने त्यांना निरोप देताना त्यांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या जागी नव्याने सचिव म्हणून नियुक्ती झालेल्या बाळासाहेब पवार यांचा शाल,श्रीफळ व फुलगुच्छ देत स्वागत करण्यात आले.

फोटो ओळ
बाणगाव बुद्रुक ;येथील बाणगाव बुद्रुक सहकारी सोसायटीची सर्वसाधारण सभेत बदली झालेले सचिव संजय फणसे व नव्याने नियुक्ती झालेले सचिव बाळासाहेब पवार यांचा सत्कार करताना सोसायटीचे अध्यक्ष तेज कवडे,जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे व संचालक,सभासद आदी

सभेमध्ये गावातील सभासदांनी सहभाग घेऊन खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभा संपन्न झाली.यावेळेस संस्थेचे सचिव बाळासाहेब पवार यांनी विषय वाचन केले,सचिव बाळासाहेब पवार यांनी आभार व्यक्त केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष तेज कवडे उपाध्यक्ष अभिमान कवडे,संचालक शांतारामकाका कवडे,प्रभाकर कवडे,मच्छिद्र कवडे,वसंत कवडे,संदीप कवडे,भावराव देवकर,जयराम जाधव,भगवान कोळेकर राजुबाई कवडे,मैनाबाई आहेर,व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.