आपला जिल्हा

नांदगावला बाप्पाची भक्तिपूर्ण वातावरणात स्थापना..

गणरायाच्या स्वागताला उत्साहाचे उधाण

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव, ता. २० : विघ्नहर्त्या : गणरायाची शहर व परिसरात उत्साहात स्थापना करण्यात आली.’गणपती बाप्पा मोरया’ च्या गजरात व भक्तिमय वातावरणात घराघरांत मंगलमूर्ती विराजमान झाली. मोठ्या मंडळांच्या ‘श्री’ ची स्थापना सायंकाळी उशिरा करण्यात आली. गणेशोत्सवामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण
नांदगाव शहर व परिसरात मंगळवारी (ता. १९) मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन झाले. गेल्या दोन दिवसांपासून गणेश भक्तांची बाजारात गणेशमूर्ती खरेदीची मोठी लगबग दिसून आली. दुपारपासूनच लहानग्यामंडळांनी रीतिरिवाजाने व साध्या पद्धतीने आपल्या लाडक्या गणरायाला घरी नेले.दुपारनंतर मोठ्या मंडळांनी बॅंड च्या तालावर सवाद्य नाचत, वाजत गाजत आपल्या लाडक्या गणरायांची सजविलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईच्या रथातून मिरवणुका काढत स्थापना केली. ‘गणपती बाप्पा’चा जयजयकार करीत,अंगावर गुलाल घेत मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या.पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यंदा पावसाने दडी मारल्याचा परिणाम गणेशमूर्तीच्या खरेदीवर जाणवला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मूर्ती दरातली वाढही जाणवली. मात्र पारंपरिक उत्सव साजरा करण्यासाठीची लगबग आज सकाळपासूनच बाजारपेठेत दिसून आली.अनेक विक्रेत्यांकडे शाडू मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. मात्र मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आकर्षक, सुंदर व सुबकमूर्तीची भुरळ खरेदी करणाऱ्या लहानग्या मंडळीत दिसून आली. शहरात गणपती मूर्तीचे यंदा मोठ्या संख्येने स्टॉल लावण्यात आलेले होते. यंदा शहर व ग्रामीण भागासह साठहून अधिक लहान-मोठ्या मंडळांची संख्या असून, त्यात चाळीस गावांतून ‘एक गाव एक गणपती’ स्थापन करण्यात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.