ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘दुष्काळाचे सावट दूर होऊ दे’ आमदार सुहासआण्णा कांदेचे गणरायाला साकडे

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना

गर्जा महाराष्ट्र24 न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता.२० आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हनुमाननगर येथील निवासस्थानी मंगळवारी (ता. १९) पुरोहितांच्या मंत्रोपचारात श्री गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.सायंकाळी आमदार सुहासआण्णा कांदे त्यांच्या पत्नी अंजुमताई कांदे व मुलगा देवाज यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यात आली.सध्या नांदगाव तालुक्यावर दुष्काळाचे संकट घोंगावत असल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यासह मतदारसंघात चांगला पाऊस पडू दे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी,समाधानाचे चांगले दिवस येऊ दे,दुष्काळ दूर सरू दे! शेतकरी चिंतामुक्त होऊ दे !!यासाठी आमदार सुहास कांदे यांनी लाडक्या गणरायाला साकडे घातले.या वेळी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नांदगाव : आमदार सुहासआण्णा कांदे,अंजुम कांदे गणरायाची प्रतिष्ठापना करताना.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.