महाराष्ट्र

नांदगाव तालुक्याची अंतिम आणेवारी २० पैशाच्या आत ठेवावी : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ची मागणी

दुष्काळाच्या सद्यपरिस्थितीती बाबत तहसीलदारांकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणीचे निवेदन

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा
नांदगाव,ता २३ तालुक्यातील परिस्थिती बघता काही तुरळक अपवाद वगळता अनेक ठिकाणी पेरणीही झालेली नसतांना जाहीर केलेली आणेवारी ही भविष्यातील मदत व सहाय्य करणेकामी जनतेसाठी अन्यायकारक व प्रशासनासाठी अडचणीची ठरू शकते.त्यामुळे दुष्काळावर मात करण्यासाठी यंत्रणेने सतर्क राहून नियोजन केले पाहिजे,पिण्याचे पाणी,जनावरांना चारा या गोष्टीचे आतापासूनच नियोजन करणे आवश्यक असून ते केले असल्यास ते जनतेपुढे आले पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या वतीने आज तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.


पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांची भेट घेऊन त्यांना तालुक्यातील दुष्कळाच्या प्रश्नावर अवगत केले या शिष्टमंडळात पक्षाचे शहराध्यक्ष चेतन पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे किसान सेलचे तालुकाध्यक्ष निलेश चव्हाण,मच्छिंद्र वाघ,साईनाथ चव्हाण,सुदाम पवार,शांताराम शिंदे,ज्ञानेश्वर निकम,सतीश लोहकरे,सदाशिव चोळके,राजेंद्र काळे,रवींद्र फोडसे,राजेंद्र जाधव,शंकर झालटे,बबन दराडे,नवनाथ बिडगर मिलिद पवारआदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता
सध्याच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम जवळपास कोरडा गेल्याने उत्पन्न नसल्यासारखे असताना देखील प्राथमिक नजर आणेवारी वस्तुनिष्ठ असायला हवी होती आता ती ३२ पैसे ते ३६ पैसे अशी निघाली आहे त्याचा आधार तपासून पुन्हा सुधारित व अंतिम आणेवारी किमान २० पैशांच्या आत यायला हवी.शिवाय दुष्काळाची घोषणा हा सोपस्कार व प्रक्रियेचा भाग न ठरता त्याची घोषणा होईल तेव्हा होईल मात्र तोपर्यंत वाट न पाहता त्या आधीच प्रस्ताव तयार करावा.तसे केले तर भीषण दुष्काळाला सामोरे जाताना प्रशासनालाही अडचण निर्माण होणार नाही.असे तहसीलदारांच्या निदर्शनास या शिष्टमंडळाने आणून दिले यंत्रणेने सतर्क राहून पिण्याचे पाणी,जनावरांना चारा या गोष्टीचे आतापासूनच नियोजन करावे असा आग्रह या निवेदनात करण्यात आला
दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी गावनिहाय उपाययोजना कराव्यात प्रत्येक गाव वाड्या वस्त्या वर टँकर सुरु करावेत चाऱ्यासाठीच्या छावण्या सुरू कराव्यात,थकीत वीज बिलांचे कारणे देऊन शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करू नये विज बिले माफ करावी,पिकविम्याची मुदत वाढवून द्यावी तालुका दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी आदी विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.