महाराष्ट्र

बाणगावला वळणावरच्या पुलावरून आयशर ट्रक कोसळला

ट्रक चालक जखमी

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नांदगांव ता.२४ नांदगाव – येवला रस्त्यावर बाणगाव गावाजवळ वळणावर पुलावरून धान्य घेऊन जाणारा आयशर ट्रक पुलावरून पलटी होऊन अपघातात झाला आहे यात वाहन चालक जखमी झाला आहे.

अधिक माहिती अशी की शनिवारी ता.२२ रात्री १ ते २ च्या दरम्यान नांदगाव येथून येवला मार्गे पुण्यास धान्य घेऊन जाणार आयशर ट्रक MH 12 RN 9728 बाणगाव बुद्रुक गावाजवळील वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने बाणगंगा नदीवरच्या पुलावरून खाली कोसळला यात सुदैवाने जीवित हानी झाली नसून नशीब बलवत्तर असल्याने वाहन चालक जखमी झाला आहे या अपघातात गाडी चे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे रविवारी सायंकाळ पर्यन्त क्रेन ने ट्रक बाहेर काढला होता. नांदगाव – येवला रस्त्याचे मजबुती व रुंदीकरण काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे रस्ता रुंद झाला पण पुलांच्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण झालेले नसल्याने पुलाच्या बाहेर रस्ता रुंद तर पुलाजवळ रस्त्या अरुंद झालेला आहे या पुलाच्या व वळणाच्या ठिकाणी बांधकाम विभागाच्या वतीने वळण दर्शविणारे बोर्ड लाविले नाही तसे काही पुलावर कठडेच राहिलेले नाही यामुळे वाहनचालक ना रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात होत प्रवाशी जखमी होत आहे तसेच गाव व शाळेजवळ गतिरोधक अथवा पट्टे न मारल्याने वाहने सुसाट वेगाने धावत आहे यामुळे कायमच अपघात होत असून यात शाळकरी मुले जखमी होत आहे

फोटो ओळ

बाणगाव बुद्रुक येथील – नांदगाव – येवला रस्त्यावर बाणगाव बुद्रुक गावाजवळील वळणावर पुलावरून कोसळेलेला आयशर ट्रक

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.