आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

दत्तराज छाजेड यांचा भाजपा व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

राजीनामा दिल्याने नांदगांव तालुक्यात मोठी खळबळ

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव,ता २६ येथील भारतीय जनता पक्षाचे जुने निष्ठावान कार्यकर्ते दत्तराज छाजेड यांनी पक्षाच्या व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदाचा आज सांयकाळी राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांना त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपविला.यापुढे पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून राहणार असल्याचे त्यांनी कळविले आहे.

दरम्यान भाजपाच्या तालुका अध्यक्ष पदासाठीचे तीन मंडळात विभाजन करून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांसमोर जातांना कसे जायचे असा सवाल त्यांनी उपस्थितीत करताना पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या या धोरणाविरोधात थेट रणशिंग फुंगले दरम्यान श्री दत्तराज छाजेड यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की,नुकत्याच जाहीर झालेल्या नाशिक जिल्हा कार्यकारिणी निवडीत व मंडल अध्यक्ष निवडीत सूचित केलेल्या निष्ठावान कार्यकर्त्याना डावलल्यामुळे मी उपरोक्त पदाचा राजीनामा देत आहे.वयाच्या सोळाव्या वर्षापासून पक्षाचे पोस्टर चिटकवण्यापासून झेंडे लावण्यापर्यंत मा.लालकृष्ण अडवाणजी,मा.कै.गोपीनाथजी मुंढे साहेब यांच्या पासून ते मा.ना.नितीन गडकरीजी आणि मा.ना.देवेंद्र फडणवीसजी यांच्यापर्यंत सर्वाच्या नांदगाव तालुक्यातील सभांचे संचलन करण्याची जबाबदारी पार पाडली.तसेच युवा र्चा तालुकाध्यक्ष,दोन टर्म नांदगाव तालुकाध्यक्ष, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष अशी विविध पदे भूषविण्याची संधी पक्षाने दिली माझ्या कार्यकाळात तालुक्यातून तीन लोकसभा मध्ये सर्वाधिक मते पक्षाला मिळाली तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये कमळ फुलले.बूथ रचनेत सर्व मंडलात उत्कृष्ट बूथ रचना व पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण वर्गाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल तत्कालीन प्रदेश अध्यक्ष मा.ना.रावसाहेब पाटील दानवे जी यांनी सन्मानित केले याकरिता मी पक्षाचा ऋणी आहे. पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून अंतिम श्वासापर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहील.असे म्हंटले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.