महाराष्ट्र

नागापूर ग्रामपंचायत परिसरात, “एक तारीख एक तास श्रमदान” उपक्रम

जिल्ह्यात दोन हजार ठिकाणी झाले एक तास श्रमदान

नांदगाव / ता ०३ महात्मा गांधी जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्या इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता पंधरवाडा उपक्रमातर्गत नांदगाव पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील विविध भागांत स्वच्छता करत श्रमदान करण्यात आले. यावेळी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात

भारत सरकार यांनी निर्देशित केलेनुसार 15. सप्टेंबर ते 2 अक्टोंबर या कालावधीत संपूर्ण देशामध्ये स्वच्छता पंधरवडा राबविण्यात आला.असून या उपक्रमाचा एक भाग म्हणून नांदगाव तालुक्यात “एक तारीख एक तास श्रमदान” हा उपक्रम प्रत्येक वाडी/ वस्ती/ गाव/ शहर यामध्ये राबविण्यात आला तालुक्यातील. प्रत्येक गावातील शाळेमध्ये शालेय परिसर/ शाळे जवळील परिसर/ ग्रामपंचायत स्तरावर विविध भागामध्ये सामूहिक स्वच्छता करणेसाठी ” एक तास श्रमदान” कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.होते
त्यानुसार तालुक्यातील नागापूर ग्रामपंचायत येथे ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. नागापूरचे थेट सरपंच राजेंद्र पवार, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी संतोष जगताप, गट शिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले,ग्रामपंचायत विस्तार अधिकारी देवीप्रसाद मांडवडे व इतर खातेप्रमुख, तालुक्यातील अधिकारी , कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक ,आशा वर्कर, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे योगदान देऊन स्वच्छता मोहिम यशस्वी केली.सरपंच राजेंद्र पवार यांनी महिन्यातून एक दिवस अशी मोहिम राबविण्याचा संकल्प याप्रसंगी केला. त्यास ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

*****

स्वछता म्हणजे.आपण आपले चांगले विचार असणे,उत्तम आरोग्य असणे, आपल्या दिनचर्येत सुसूत्रता आणणे अभिप्रेत आहे.प्रत्येक घरात स्वच्छता ठेवल्याने पर्यायाने गाव स्वच्छ होईल.जमा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावणे आवश्यक आहे.गावाच्या विकासासाठी तालुकास्तरावर प्रयत्न केले जातील.
गणेश चौधरी – गटविकास अधिकारी नांदगांव

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.