महाराष्ट्र

भालूरच्या  सरपंचपदी शालूबाई थेटे बिनविरोध निवड   

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

भालूर ता.१० येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शालूबाई थेटे यांची बिनविरोध निवड..

ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच अर्चना निकम यांनी आवर्तन पद्धतीनुसार आपला राजीनामदिल्याने रिक्त झालेल्या पदावर शालूबाई थेटे यांची बिनविरोध निवड झाली आहे.फेब्रुवारी २०२१ मध्ये ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निकालानंतर ठरल्यानुसार अर्चना निकम यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आवर्तननुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर रिक्त पदाच्या निवडीसाठी झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत शालूबाई थेटे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामपंचायत विभागाच्या विस्तार अधिकारी व्ही.के.ढवळे यांनी शालूबाई थेटे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर घोषित केले. निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला.त्यानंतर नवनिर्वाचित सरपंच शालूबाई थेटे यांची गावातून रथावरून भव्य मिरवणूक काढत कार्यकर्त्यांनी डी.जे.च्या तालावर ठेका धरत विजयी घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला.मिरवणुकीप्रसंगी गावातील महिलांनी औक्षण करत शुभेच्छा दिल्या.यावेळी दिगंबर निकम,श्रावण गोरे,विक्रम निकम,देविदास निकम,बापू महाराज निकम,राजू जाधव,अप्पासाहेब मडके,दत्तू बोराडे,दादासाहेब धनगे,राजेश निकम,वसंत निकम,राजेंद्र मेंगळ,माधव निकम,गणपत निकम,नंदू इल्हे,भागवत पवार,दत्ता पाबळे,अरुण थेटे,भाऊसाहेब सोमासे,विनायक लहिरे,शरद हेंबाडे,रमेश आहेर,संतोष निकुले,बापू निकम,नंदू वाळुंज,देविदास मडके,रामभाऊ मडके,कैलास घोरपडे,भाऊसाहेब आहेर,कैलास मडके,नितीन आहेर,पुंजाराम गलांडे, प्रशांत गायकवाड आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी तलाठी घोडके,ग्रामसेवक वाय.एस.निकम यांनी सहाय्य केले. 

*******
सरपंच पदासाठी मला बिनविरोध निवडून दिल्याबद्दल सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे आभार गावच्या विकासात्मक कामासाठी सर्वांना विश्वात घेऊन कामे करणार आहे
शालूबाई थेटे ..नवनिर्वाचित सरपंच भालूर
                                                 
                                : भालूर : सरपंच शालूबाई थेटे यांच्या  निवडी प्रसंगी जल्लोष करताना कार्यकर्ते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.