महाराष्ट्र

नांदगावला जेष्ठ नागरिक संघाचा तेवीसावा वर्धापनदिनी पंचाहत्तरी ओलांडलेल्या जेष्टांचा सन्मान

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव,ता १०. वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या जेष्टांच्या जीवनातील प्रत्येक दिवस चैतन्याचा असो अशी भावना बाळगत येथील जेष्ठ नागरिक संघाने आपला संघाचा स्थापनेचा तेवीसावा वर्धापन दिन साजरा केला.

कै.भालूभाऊ धामणे यांच्या प्रेरणेतून स्थान झालेल्या नांदगाव येथील जेष्ठ नागरिक संघाच्या स्थापनकाळात विधायक उपक्रमशीलता राबवित सामाजिक बांधिलकी व्यक्त करण्यासाठी नांदगावच्या जेष्टांच्या संघाने गतकाळात जोडलेल्या आपल्या सहकाऱ्यांच्या पंचाहत्तरीची आठवण ठेवत पंचाहत्तरी ओलंडलेल्या सहकाऱ्यांच्या पप्रती कृज्ञतेचा भाव ठेवत यथोचित सत्कार केला आपला सन्मान होताना बघून हे जेष्ठ भारावून गेले
उर्वरित आयुष्यात एक सन्मानित,सुरक्षित,आरोग्य सुविधायुक्त वातावरण देण्यासाठी आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहोत असा धीराचा शब्द जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरजमल संत,रंगनाथ चव्हाण,जयवंत साळवे रमाकांत सोनवणेआदींनी आपल्या समकालीन सहकाऱ्यांना दिला अन हे जेष्ठ क्षणभरासाठी सुखावले सेवानिवृत्त प्राध्यापक कवी साहित्यिक सुरेश नारायणे यांनी समाजाला नवी संजीवनी देणारी एक पाणपोई आहे. समाजसेवा करणारे जेष्ठ नागरिक संघ एक समाज मंदिर असल्याचे प्रतिपादन यावेळी केले लक्ष्मीनगर येथील जेष्ठ नागरिक संघाच्या (विरंगुळा केंद्र) कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रावण आढाव होते श्रीकृष्ण रत्नपारखी,श्री पवारकाका डॉ माळीकाका श्री बाच्छावकाका आदींच्या भेटी घेण्यात आल्यात या कार्यक्रमाला जोडून माजी सैनिकांचाही विशेष सत्कार करण्यात आला
माजी सैनिक संजय खैरनार,भाऊसाहेब भालेराव,श्रावण आढाव वामन पोतदार,सुरेश दंडगव्हाळ,सुधाकर निकम यांनी मनोगत व्यक्त केले
जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष जयवंत साळवे,सुरजमल संत,गरुड काका, रमाकांत सोनवणे, खंडेराव खैरनार,विलास बच्छाव,माणिक तात्या कवडे, डॉ.चंद्रभान काकळीज,गंगाधर थोरात,हुकुमचंद जैन,अंबादास पैठणकर, आण्णा सोनवणे,पांडुरंग मोहिते,भाऊसाहेब जाधव,बाबुलाल थोरात, ओमकार साबळे,एम सुर्यवंशी,केवळ बोरसे,हिरामण जावरे,बाळासाहेब निकम,रामभाऊ सोर,शानु बडोदे,दादा गरुड,छबु पवार आदी यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजीराव निकम यांनी केले तर आभार विलास बच्छाव यांनी मानले.

नांदगाव :- जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने मेजर जगन्नाथ साळुंके यांची आस्थापूर्वक विचारपूस करताना सुरजमल संत सोबत सुधाकर निकम जयंत साळवे रमाकांत सोनवणे आदी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.