महाराष्ट्र

अतुल आढाव व राजू घोटेकर यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगांव ता.११ नांदगाव तालुक्यातील वडाळी येथील ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संघ संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर वडाळी बुद्रुक शाळेतील कर्तव्यदक्ष शिक्षक अतुल शिवाजी आढाव व वडाळी खुर्द जिल्हा परिषदेच्या शाळेचे आदर्श मुख्याध्यापक राजू घोटेकर यांना नुकताच ज्ञानज्योती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था टाकळीभान तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर यांच्या वतीने शिक्षकरत्न पुरस्कार देण्यात आला.यावेळी मठाधिपती श्रीराम साधना आश्रम मुंकिदपुर गुरुवर्य महंत सुनीलगिरीजी महाराज,नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ आमदार किशोर दराडे आदी यावेळी उपस्थित होते

अतुल आढाव


राजू घोटेकर
तालुक्यातील वडाळी खुर्द,वडाळी बुद्रुक येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर, वडाळी बुद्रुक शाळेतील उपशिक्षक अतुल शिवाजी आढाव यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच पंचक्रोशीत नावाजलेल्या स्वच्छ आणि सुंदर व गुणवंत शाळा असलेली जिल्हा परिषद शाळा वडाळी खुर्द चे आदर्श मुख्याध्यापक राजू घोटेकर यांना शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या दोन्ही शिक्षकांना शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे पंचक्रोशीतील शैक्षणिक, सामाजिक,कृषी,राजकीय आणि ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संघ वडाळी बुद्रुक संस्थेचे अध्यक्ष डॉ सागर भिलोरे,उपाध्यक्ष,सचिव व सर्व संचालक मंडळ तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर वडाळी बुद्रुक मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने व पंचक्रोशीतील पालक,शिक्षक,विद्यार्थी यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.