महाराष्ट्र

मानधन वेळेवर मिळत नसल्याने ग्रामरोजगार सेवकाची आत्महत्या

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

औसा ता.११ : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून ग्रामरोजगार सेवक या पदावर काम करीत असणाऱ्या ग्रामरोजगार सेवक यांना मिळणारे अल्प मानधन तेही वेळेवर मिळत नसल्याने ग्रामरोजगार सेवकांना आपल्या दैनंदिन कौटुंबिक गरजा भागविण्याच्या अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने आर्थिक विवंचनेतून ग्रामरोजगार सेवक आत्महत्या करत असल्याच्या घटना राज्यात घडत आहे,नांदेड जिल्ह्यात ग्रामरोजगार सेवकाने मानधन अभावी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सोशल मीडियावर माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील कळका ता. कंधार येथील ग्रामरोजगार सेवक संतोष कळकेकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.कारण त्यांनी गेल्या सहा ते सात महिन्यापासून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम केलेले आहे परंतु मानधनावर होणारा वितरित निधी आणि मानधन पंचायत समितीने वेळेवर न काढल्याने.सद्यस्थितीत आणि महागाईच्या वातावरणात कुटुंबातील दैनंदिन आर्थिक अडचणींना सामोरे जाता – जाता अखेर या आर्थिक संकटांना कंटाळून दुर्दैवाने ग्रामरोजगार सेवक संतोष कळकेकर यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडल्याने नाशिक जिल्ह्यात सोशल मीडियावर या घटनेची वृत्त कळताच सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे.आत्महत्या केलेल्या संतोष च्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी राज्यशासनाने घ्यावी आणि मयत संतोष यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून आर्थिक आधार द्यावा अशी मागणी महाराष्ट्रातील ग्राम रोजगार सेवक संघटना आयटक आणि मनरेगातील कंत्राटी कर्मचाऱ्याकडून केली जात आहे

—-
ग्रामरोजगार सेवक हा रोहयोत प्रशासन व गाव यामध्ये महत्वाचा दुवा आहे.दुर्दैवाने राज्यात ग्रामरोजगार सेवकांची राज्यसरकार आर्थिक पिळवणूक करीत आहे एकतर अल्प मानधन व तेही सहा – सात महिन्याने मिळते यामुळे ग्रामरोजगार सेवकांना आपले कुटुंबाचे उदरनिर्वाह करता येत नाही यामुळे रोजगार सेवकाची मानसिकता ढासळून आत्महत्या चे पाऊल उचले जात आहे,ग्रामरोजगार सेवकांना किमान वेतन प्रमाणे १५ हजार रुपये मानधन दरमहा द्यावे…

कॉ राजू देसले राज्यध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटना आयटक

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.