महाराष्ट्र

सार्वजनिक गणेश मंडळात “नांदगावचा इच्छापूर्ती” तर घरगुती मध्ये ‘अथर्व खटके’ प्रथम

नांदगाव ला दैनिक आवाजचा बक्षीस समारंभ दिमाखात साजरा

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा
नांदगाव(मारुती जगधने)
नांदगाव ता.११ दैनिक आवाज तथा संस्थापक नवक्रांती युवक संघातर्फे यावेळी गणेशोत्सव दरम्यान सार्वजनिक गणेश मंडळांसाठी “आकर्षक गणेश मूर्ती आणि उत्कृष्ट सजावट स्पर्धा ” तर घरगुती गणपती साठी “आमच्या पप्पांनी गणपती आणला” अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्याचा बक्षीस समारंभ जुन्या तहसिल आवारात बुधवार ता ११ रोजी आयोजित करण्यात आला होता.

.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड किरण जाधव यांनी केले. कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुणे म्हणून योजना अकोलकर (उपअधीक्षक भूमीभिलेख) ,प्रीतम चौधरी (पोलीस निरीक्षक,नांदगाव) यांच्या हस्ते गणरायाच्या प्रतिमेचे हार-पुष्प वाहून पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.पाहुण्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले.प्रसंगी जेष्ठ पत्रकार जगन पाटील,पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी,भगवान सोनवणे यांचे मनोगत झाले.तदनंतर सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून भूमिका बजावलेले ऍड.किरण जाधव,इंजि.बिरु शिंदे,देविदास देवरे,शंकर विसपुते यांनी दिलेल्या निकालानुसार सार्वजनिक मंडळांमध्ये प्रथम क्रमांक इच्छापूर्ती राजा,बजरंग मंडळ नांदगाव यांना रोख रक्कम 3001 / आणि सन्मानचिन्ह तर घरगुती मध्ये ‘अथर्व खटके’ यास प्रथम क्रमांक म्हणून रक्कम रु.1001 / आणि सन्मानचिन्ह असे देण्यात आले.तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये द्वितीय क्रमांक मोरया प्रतिष्ठान यांना रक्कम 2001 रु आणि सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक नांदगावचा राजा यांना 1001 रु आणि सन्मानचिन्ह असे तर उत्तेजनार्थ म्हणून हनुमान नगर मित्र मंडळ,शिवरुद्र मित्र मंडळ,नांदगाव चा महाराजा,बाप्पा मोरया गणेश मित्र मंडळ नायडोंगरी ,जय मल्हार गणेश मित्र मंडळ जातेगांव ,शंभूराजे प्रतिष्ठान बोलठाण, शिवराज मित्र मंडळ ,मल्हारवाडी तर “आमच्या पप्पांनी गणपती आणला” स्पर्धेत द्वितीय क्रमांक पूजा पडवळ यांना 1001 रु आणि सन्मानचिन्ह,तृतीय म्हणून गुप्ता परिवार यांना 501 रु आणि सन्मानचिन्ह तर अमर चव्हाण,मनमाड विलास राठोड मुळंडोंगरी यांना उत्तेजनार्थ सन्मानचिन्ह देण्यात आले.


कार्यक्रमाप्रसंगी शहरातील तसेच ग्रामीण भागातील गणेश मंडळ आणि नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचलन देविदास देवरे यांनी तर आभार प्रदर्शन इंजि.बिरु शिंदे यांनी केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.