महाराष्ट्र

डॉक्टर नवरा व सासऱ्याकडून महिला डॉक्टरचा दगडाने ठेचून निघृण खून;

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव, ता ११ तालुक्यातील न्यायडोंगरी येथील महिला डॉक्टर भाग्यश्री किशोर शेवाळे यांचा अपघाती मृत्यू नसून त्यांचा दवाखान्याच्या बांधकामासाठी पंचवीस लाखाची मागणी पूर्ण न झाल्याने नवरा डॉक्टर किशोर शेवाळे व सासरा नंदू राघो शेवाळे यांनी संगनमताने दगडाने ठेचून व बाटली मारून जीवे मारल्याची फिर्याद भाऊ सचिन साळुंके यांनी ( रा. वैजापूर ) यांनी नांदगाव पोलिसात फिर्याद दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे
याबाबत थोडक्यात माहिती अशी २७ सप्टेंबरला न्यायडोंगरी येथील जय जनार्दन नगर ( तारुतांडा ) येथे राहणाऱ्या केशराई क्लिनिकचे डॉ. किशोर शेवाळे यांच्या पत्नी सौ डॉक्टर भाग्यश्री यांचे मन्याड फाट्यावर अपघातात निधन झाले होते कासारी येथील क्लिनिक चे काम संपवून डॉ भाग्यश्री या आपले सासरे नंदू शेवाळे यांच्या सोबत दुचाकीवरून न्यायडोंगरीला येत असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला यानंतर त्यांचे मामा दिलीप आहेर यांनी जखमीवस्थेत डॉ भाग्यश्री याना वैद्यकीय उपचारासाठी चाळीसगावला दाखल केले मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे बघून तेथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी सदर घटनेची बाब चाळीसगाव पोलिसांना कळविले त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करीत चाळीसगावच्या पोलिसांनी या घटनेची नोंद नांदगावच्या पोलिसांकडे वर्ग केली
सदरचा अपघात घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत असला तरी पोलिसात तशी तक्रार दाखल नसल्याने सुरुवातीला या घटनेकडे अकस्मात म्हणूनच बघितले गेले मात्र मृत्यनंतरचे सर्व विधी पार पडल्या नंतर दिवंगत डॉ भाग्यश्री यांचा वैजापूर येथील भाऊ सचिन साळुंके यांनी आपल्या डॉक्टर बहिणीचा नवरा डॉ किशोर शेवाळे व सासरा नंदू शेवाळे या दोघा बापलेकाने दवाखान्याच्या बांधकामासाठी पंचवीस लाखाचीत्यांची मागणी पूर्ण न झाल्यानेपैशासाठी आपल्या बहिणीचे जीवन संपविले असल्याची फिर्याद दाखल केली मनमाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख यांच्या मागदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितिन खंडागळे उपनिरक्षक मनोज वाघमारे, पोलिस उपनिरक्षक संतोष बहाकर तपास करीत आहेत.

डॉ. भाग्यश्री

सोबत दिवंगत महिला डॉ भाग्यश्री यांचा फोटो

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.