महाराष्ट्र

वावी येथील तरुणाची आत्महत्या

अधिक परताव्याचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक;

गर्जा महाराष्ट्र24 न्युज

सिन्नर :ता.१३ अधिक परताव्याचे आमिष दाखवून कोलकत्ता स्थित पत्ता असलेल्या एका कंपनीकडून ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याची बाब सहन न झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील वावी ता.सिन्नर येथील तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.आहे
राहुल योगेश वाघ 22 याने मोबाईल ॲप च्या साह्याने एका कंपनीकडे अधिक परतावा मिळेल म्हणून 11 हजार रुपये भरले होते. त्याला किरकोळ रक्कम कंपनीकडून परत देखील मिळाली होती,अधिक फायदा हवा असेल तर आणखी 25 हजार रुपये भरण्याची मागणी कंपनीच्या प्रतिनिधीकडून फोनद्वारे त्याच्याकडे करण्यात येत होती.
मोलमजुरीचे काम करणाऱ्या व सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्या राहुल कडे एवढे पैसे नसल्याने त्याने अगोदर भरलेली रक्कम परत करण्याची विनंती कंपनीच्या प्रतिनिधीकडे केली होती.त्याकडे दुर्लक्ष करत कंपनीच्या प्रतिनिधीकडून वारंवार फोन करून अधिक रक्कम भरण्यास सांगितले जात होते. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे पाहून निराश झालेल्या योगेशने बुधवारी सकाळी वावी येथील गणपती मंदिर परिसरातील राहत्या घरात छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.