आपला जिल्हामहाराष्ट्र

शनि अमावस्यानिमित्त नस्तनपूर ला भाविकांची मांडीआळी

हजारो भाविकांनी घेतले दर्शन

गर्जा महाराष्ट्र 24 महाराष्ट्र   
           
न्यायडोंगरी ता.१४ शनिची इडा पिडा टळू दे,साडेसाती दूर कर म्हणत आज शनि अमावस्याचे औचित्य साधून नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथे हजारो भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दरम्यान अमावस्या असल्याकारणाने गर्दीवर परिणाम जाणवला मात्र सायंकाळपर्यंत हजारोंच्या वर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.दुपारची आरती शिर्डी येथील उद्योगपती निलेश जपे यांच्या हस्ते करण्यात आली

भारतातील साडेतीन शनिपिठांपैकी पुर्ण पीठ असलेले नांदगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र नस्तनपूर येथील शनी देवाची यात्रा शनिवारी ता.१४ रोजी मोठ्या उत्साहात पार पडली या वर्षी नांदगाव तालुक्यात भयानक दुष्काळी संकट उभे राहिले असून या संकटातून सावरण्याची शक्ती सर्वांना दे अशी विनवणी करत हजारो भाविकांनी शनीदेवाच्या चरणी नतमस्तक होत प्रार्थना केली .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.