महाराष्ट्र

कुत्राच्या हल्यात जखमी झालेल्या मोरास आणि विजेचा झटका लागलेल्या बगळ्याला सर्पमित्र आणि वनविभागाचे दिले जीवनदान .

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव,ता १५ कुत्राच्या हल्यात जखमी झालेल्या मोरास आणि विजेचा झटका लागलेल्या बगळ्याला सर्पमित्र यांच्या सहकार्यातून आणि वनविभागाच्या वतीने जखमी पक्षांवर उपचार झाल्याने या दोघी पक्षांनी जीवनदान मिळाले तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथे काही भटक्या कुत्र्यांनी मोरावर अचानक हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला सर्पमित्र प्रभाकर निकुंभ,शिक्षक विजय तुरकूने यांनी वनविभागाला कळविल्याने
वनरक्षक एम बी पाटील आर यु गंडे रामदास मोरे यांनी जखमीवस्थेतील मोराला नांदगावच्या पशुवैद्यकीय उपचार केंद्रात आणले पशुवैद्यकीय डॉक्टर संतोष लोंढे यांनी जखमी मोरावर शस्रक्रिया केली व मोराला सुरक्षित नैसर्गिक सहवासासाठी मुक्त केले दरम्यान दुसऱ्या एका अन्य घटनेत शहरातील एका हॉटेलजवळ बंगल्याला विजेचा शॉक लागल्यावर सर्पमित्र सागर विसपुते आणि पंकज शर्मा यांनी मूर्च्छितअवस्थेतल्या बगळ्याला उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन आले. मोराचा उपचार चालू असताना सोबतच या बगळ्यावरही वैद्यकीय उपचार करण्यात आल्याने त्यालाही जीवदान मिळाले
पशुवैद्यकीय डॉक्टर सुरवसे, डॉक्टर जी एस जाधव, डॉ ईश्वर जाधव, मंगेश आहेर,आदी यावेळी उपस्थित होते.वन्यजीव संरक्षण बहुद्देशीय संस्थेच्या वन्यप्रेमी सदस्यांनी बजाविलेल्या या विधायक कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे मंगेश आहेर पंकज शर्मा सागर संदीप जाधव विसपुते पवन झाडगे आदी उपस्थितीत होते

नांदगाव:-मोर आणि बगळा पक्षावर यशस्वी उपचार करण्यात आले या वेळी उपस्थित आसलेले सर्पमित्र आणि वनविभागाचे कर्मचारी

फोटो ओळ:
नांदगाव:-मोर आणि बगळा पक्षावर यशस्वी उपचार करण्यात आले या वेळी उपस्थित आसलेले सर्पमित्र आणि वनविभाग कर्मचरी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.