महाराष्ट्र

नांदगावला श्री एकविरा देवीच्या शारदात्सोवाला प्रारंभ

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेव

नांदगाव,ता १५ शहराचे श्रद्धस्थान व आराध्य ग्रामदेवता असलेल्या श्री एकविरा देवीच्या शारदात्सोवाला आज आश्विन शुद्ध प्रतिपदे पासून प्रारंभ झाला भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे यानिमित्ताने सलग नऊ दिवसासाठी एकविरा देवी मंदिरात विविध धार्मिक उपक्रम संपन्नहोत असतात या उत्सवकाळात देवीचे मंदिर दररोज पहाटे पाच उघडते,साडेपाचला त्यानंतर दुपारी साडेबाराला माध्यान्ह आरती होऊन देवीला नेवैद्य दिला जातो रात्रीसाडे आठला महा आरती व महाप्रसाद होते यंदाही मंदिराच्या प्रांगणात भाविक महिलांकडून परंपरेप्रमाणे घटस्थापना करण्यात आली असून या नवरात्रोत्सवात देवीच्या मूर्तीला नऊ दिवसात नऊ पैठण्या नेसविल्या जातात व कुंकू मळवट व साजशृंगाराने देवीच्या मूर्तीला सजविले जाते अष्टमीला सकाळी अकरा पासून दुपारी चारपर्यंत हवन व देवी याग केला जातो विजयादशमीला नऊ दिवसांचे पारायण संपन्न होते अलीकडेच आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या पन्नास लक्ष रुपयाच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेतून ग्रामदेवता एकविरा देवीच्या मंदिर परिसराचा मोठ्या प्रमाणात कायापालट करण्यात आले आहे त्यातून मंदिर परिसराचे सुशोभीकरणाच्या कामामुळे नव्याने तयार करण्यात आलेल्या एकतीस फुटाच्या दगडी दीपमाळेने मंदिराच्या सौंदर्यात भर पडली आहे पूर्णपणे दगडी बांधकाम असलेल्या नऊ मीटर उंचीची या दीपमाळेतल्या शंभरहून अधिक पारंपरिक दिव्यांनी या निमित्ताने मंदिराचा परिसर उजळून निघाला आहे शांत,सौम्य अशा उजेडाने सारा मंदिर परिसरातली प्रसन्नता राखण्यास हातभार लागला आहे.

# ठळक वैशिट्ये ! ##
नांदगाव चे आराध्यदैवत
भगवती श्री एकविरा माता नवसाला पावणारी आहे अठरा भुजा असलेल्या एकाविरेची धुळ्यात व नांदगाव अशा दोन ठिकाणी मूर्ती आहेत श्री एकविरा देवीचे मंदिर गावाच्या पश्चिमेला शाखांबरी नदीच्या काठावरील असलेले मंदिर पेशवेकालीन असल्याची आख्यायिका आहे. मंदिराच्या कामातील रेखीवपणा लक्ष वेधून घेतो.मंदिरासमोर भव्य व उंच अशी दगडी दीपमाळ असून त्याच्या पायाशी गणेशाची मूर्ती मनोहारी अशी आहे


फोटो ओळी
नांदगाव:- शहराचे आराध्यदैवत एकविरा देवी मंदिरासमोरील आकर्षक दीपमाळ पहिल्या छायाचित्रात दुसऱ्या छयाचित्रात भाविकांची गाभाऱ्यातील एकविरा देवीच्या दर्शनासाठी गर्दी तिसऱ्या छायाचित्रात मंदिराच्या प्रागंणात भबिक महिलांनी बसविलेल्या घटी ,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.