महाराष्ट्र

नांदगावच्या वृत्तपत्र विक्रेत्यांकडून वाचकदिन साजरा

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव,ता.१५ माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचक प्रेरणादिन म्हणून साजरा करण्यात आला. येथील जेष्ठ वृत्तपत्र वितरक किशोर तल्हार यांच्या विक्रीस्टाँलवर दिवगंत माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृतींना अभिवादन करुन विक्रेत्यांनी परस्परांना हार्दिक शुभेच्छा दिल्यात
ज्ञानसंपन्न व माहितीसमृद्ध समाजाची घडण,व्यक्तिमत्त्व विकास, साहित्य विकास आणि भाषाविकास यांसाठी वृत्तपत्रे वाचन अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन किशोर तल्हार यांनी व्यक्त केले.दिवगंत माजी नगराध्यक्ष कै.माधवराव आहेर कै.गजानन (बापू) आहेर भिवसन आहेर शरद आहेर व सध्या प्रमीत आहेर अशी आहेरांची चवथी पिढी तर किशोर तल्हार यांच्या वडीलांपासून ते मुले धिरज आकाश यांच्या पावेतो तिसरी पिढी वृत्तपत्राच्या वितरण व्यवसायात आहेत आज सकाळी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला किशोर तल्हार बाबासाहेब बोरसे प्रमीत आहेर धिरज तल्हार राजू नरोटे दिपक देवरे आकाश तल्हार व शंकर आदी विक्रेते उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.