महाराष्ट्र

वंजारवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य पंकज जाधव यांचे उपचारादरम्यान निधन

गर्जा महाराष्ट्र24 न्युज वृत्तसेवा
मनमाड ता.१६ तालुक्यातील वंजारवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य पंकज ज्ञानेश्वर जाधव (वय ३८,) यांना मनमाड-येवला मार्गांवर कॅम्प विभागात अज्ञात वाहण्याने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अपघातानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली.मात्र रविवारी (ता.१५) रोजी त्यांची मृत्यूशी झुंज देत असताना निधन झाले आहे.
वंजारवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य पंकज जाधव आमदार सुहास कांदे यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित होते.शनिवारी (दि. १४) मनमाड येथे एका गाळ्याचे स्टाईल बसविणे,लाईट फिटिंग करणे आधी कामकाज आटपून रात्री ते वंजारवाडी येथे घरी जात असताना मनमाड-येवला महामार्गावर कॅम्प विभागात त्यांना अज्ञात वाहण्याने जोराची धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.त्यांना तातडीने मनमाड येथे प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नाशिक येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली.मात्र रविवारी त्यांचे मृत्यूशी झुंज देत असताना निधन झाल्याने परिसरात हळहळ होत आहे. त्यांच्या पश्चाच आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. रविवारी रात्री आठ वाजता त्यांच्या राहत्या गावी वंजारवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते सदर घटनेची माहिती मिळताच आमदर सुहासआण्णा कांदे यांनी शोक व्यक्त केला आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.