महाराष्ट्र

दुष्काळाच्या मुल्यांकनातून कोणत्या निकषावर नांदगाव तालुक्याला वगळले ?

राष्ट्रवादी (शरद पवार ) काँग्रेसचा सवाल;खुलाशाची मागणी

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा
नांदगाव,ता १७ जिल्ह्यातील सर्वात निच्चांकी पर्जन्यमानाची नोंद झालेल्या तालुक्यात झाली असूनही त्याचा परिणाम एकूण खरीप हंगामावर होऊन उत्पन्नावर झाला आहे पाऊस नाही म्हणून भूगर्भातील जलपातळी घटल्याने जलसाठे कोरडेठाक पडले असून खरिपाचा हंगाम वाया गेला असल्यामुळे तालुक्याची प्राथमिक नजर आणेवारी देखील छत्तीस पैशांच्या आली असतानाही ट्रिगर १व ट्रिगर मधून तालुक्याला वगळताना कोणते निकष गृहीत धरले याचा वस्तुनिष्ठ खुलासा करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गटाचे ) तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी तहसीलदारांकडे केली

बारा ऑक्टोबरला मदत व पुर्नवसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर यांच्या स्वाक्षरी निशी काढण्यात आलेल्या खरीप हंगाम २०२३ हंगामाच्या दुष्काळातील मूल्यांकनाबाबत परिपत्रकात जिल्ह्यातील मालेगाव,सिन्नर व येवला सह राज्यातील बेचाळीस तालुक्यात ट्रिगर १ व ट्रिगर २ लागू करण्यात आला त्यात जिल्ह्यातील गंभीर दुष्काळ असलेल्या नांदगावचा अंतर्भाव नसल्याने याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) पक्षाने तहसीलदारांचे लक्ष आज त्यांनासादर केलेल्या निवेदनात वेधले आहे
हा दुष्काळग्रस्त नांदगाव तालुक्यावर अन्याय आहे म्हणून सदर क्षेत्रीय सर्वेक्षणाची योग्य कार्यवाही करणे व त्याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास नमूद वेळेत काटेकोरपणे पाठविणे अपेक्षित आहे जेणेकरून दुष्काळाची परिस्थिती ग्राह्य धरून नांदगाव तालुका दुष्काळी घोषित करण्याची कार्यवाही प्रशासनास करता येईल सदर कामात प्रशासनाच्या वतीने हयगय झाल्यास होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी प्रशासनाची राहील. दिवसेंदिवस टँकर्सची संख्या वाढत असून जनावरांच्या पिण्याचे पाणी व चारा टंचाईचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे मात्र अशी सर्व पार्श्वभूमी असूनही Trigger-1 व Trigger-2 मधून नांदगाव तालुक्याला वगळण्यात आले आहे त्यासाठी कोणते निकष गृहीत धरण्यात आलेत त्याचे स्पष्टीकरण झालेच पाहिजे कारण हा दुष्काळग्रस्त नांदगाव तालुक्यावर अन्याय आहे म्हणून सदर क्षेत्रीय सर्वेक्षणाची योग्य कार्यवाही करणे व त्याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास नमूद वेळेत काटेकोरपणे पाठविणे अपेक्षित असल्याचे श्री बोरसे यांनी या निवेदनात म्हटले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.