महाराष्ट्र

आझादनगरच्या रस्त्यासाठी तकदीर सरोदे यांचे उपोषण

रेल्वेकडे पत्रव्यवहार करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा
नांदगाव,ता १६ आझादनगर ते नांदगाव जाणाऱ्या रोडसाठी भूमी अधिग्रहणाचा प्रस्ताव विनाविलंब पाठवून पाठविण्याबाबत ची कार्यवाही व्हावी या मागणीसाठी आझादनगर चे ग्रामस्थ तकदीर सरोदे यांनी आज पालिका कार्यालयापुढे उपोषण केले दरम्यान भूमी अधिग्रहणासाठी रेल्वे विभागाशी लेखी पात्र व्यवहार करीत असल्याची हमी मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले सध्या रेल्वेच्या तिसऱ्या ट्रॅकचे काम सुरु करतांना जुना रस्ता त्या भूसंपादनात गेल्यामुळे आझादनगरच्या ग्रामस्थांना शहरात जाण्यायेण्यासाठी रस्ताच शिल्लक राहिला नसल्याने हा रस्ता मिळावा या मागणीसाठी अझादनगरचे तकदीर सरोदे,मनेष पाटील आदींसह या ग्रामस्थांचा तीन वर्षांपासून लढा सुरु आहे रेल्वे ट्रॅकला समांतर रस्ता तयार करून मिळावा यासाठी सरोदे यांनी उपोषण केले मुख्याधिकाऱ्यानी रस्त्याच्या भूसंपादनातील तांत्रिक अडथळे ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिले भूमी अभिलेख विभागाने पालिकेकडे अंगुलीनिर्देश एका लेखी पत्राद्वारे केला होता मात्र मुख्याधिकाऱ्यानी त्यांच्या कार्यालयाने केलेल्या पत्रव्यवहाराचा तपशीलच उपोषण कर्त्या पुढे ठेवल्याने आता रेल्वेकडून किती अंतर सोडले जाणार याबाबत कळविले जाणार असून त्यानंतर भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी धांडे यांनी दिली या उपोषण वेळी उदय पाटील,मनेश पाटील,निंबा पाटील,आरिफ मंसुरी,समद मंसूरी,भाऊसाहेब पाटील,विजय पाटील,उस्मान मन्सुरी,भाऊडू पाटील,अंकुश डोळे,संजय पाटीलआदी उपस्थितीत होते

फोटो ओळी
नांदगाव:- पालिका कार्यालयांपुढे उपोषण करतांना आझादनगर येथील तकदीर सरोदे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.