ताज्या घडामोडी

तालुक्यातील महिलांची शासकीय कार्यालयातील अडवणूक थांबवा;समता परिषदेच्या महिला आघाडीची मागणी

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव,ता १६  तालुक्यातील महिला व गोरगरीब व्यक्तींचे नांदगाव तहसील कार्यालयात कामे होत नाही.अर्ज देऊनही व सर्व पूर्तता करूनही कामे होत नाही.घरकुल योजना,रेशनकार्ड,नवीन रेशन कार्ड,बारकोड नंबर,दुय्यम रेशन कार्ड,रेशनकार्ड ऑनलाइन करणे,ऑनलाइन दुरुस्ती करणे,श्रावणबाळ योजना,संजय गांधी योजना,विधवा पेन्शन योजना, सांप्रदाय मंडळ पेन्शन योजना इतर कामे होत नाहीत.अर्जदार चकरा मारून फेरे मारून थकून जातो.अर्जदार हा मजुरी करणार वर्ग असल्याने त्याला वारंवार चकरा मारणे परवडत नाही.अशिक्षित असल्याने त्यांना सहकार्य केले जात नाही.उलट त्यांना उडवा-उडवीचे उत्तरे देऊन त्यांना मानसिक त्रास दिला जातो.तरी महिला व गोरगरिबांची कामे लवकरात लवकर व्हावे असे निवेदन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पूजा आहेर एंडाईत यांच्या नेतृत्वाखालील महिलांच्या शिष्टमंडळाने आज तहसीलदारांना दिले तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना हे निवेदन देण्यात आले अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनरावजी भुजबळ व माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्षा पूजा आहेर एंडाईत यांनी  तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना निवेदन देऊन महिलांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.समता परिषदेच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा चंद्रकला बोरसे,परिषदेचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील,शहराध्यक्षा सुगंधा खैरनार, माजी नगरसेवक वाल्मिक टिळेकर,माणिक बाविस्कर,रंजना सोनवणे, प्रमिला आहेर,निर्मला आहेर,मंगला बोरसे,ताराबाई तावडे,विजया बोरसे, जयश्री खैरे,आशा खैरनार,बाळू सोनवणे,भारत ठाकरे,दायकु दळवी, पुनमचंद चव्हाण,माया मोरे,लंकू मोरे,विमलबाई सोनवणे,इंदुबाई ठाकरे, वंदना ठाकरे,अनिता वाघ,बाईजाबाई दळवी,नायजाबाई दळवी, पातळाबाई मोरे,मंगलाबाई सोनवणे,सिंधू दळवी,कमा दळवी,उषा दळवी,सुनीता जगधने,नर्मदाबाई आहेर,गीता दळवी,पुष्पा मोरे,मायाबाई मोरे,अनिता दळवी,अंजनाबाई चव्हाण,वैशाली चव्हाण,सुरेखा चव्हाण, सिंधुबाई चव्हाण,कौशलाबाई चव्हाण,सखुबाई चव्हाण,देविदास राठोड, धर्मा पवार,जनाबाई चव्हाण,सुशीला पवार,सुरेखा मोकळ,बबलू चव्हाण, तुकाराम माळी,विक्रम तावडे,सुनिता आहेर,सौदराबाई चव्हाण,सुनीताबाई मुकणे आदी उपस्थित होते 

फोटो ओळी नांदगाव:- तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना निवेदन देताना समता परिषदेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा  पूजा आहेर-एंडाईत,चंद्रकला बोरसे, अशोक पाटील,सुगंधा खैरनार, वाल्मिक टिळेकर आदी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.