आपला जिल्हा

नांदगावला प्रभू श्री विश्वकर्मा मंदिराच्या कंपाउंडमधील बांधकाम तोडल्याने जिल्हाभरात सुतार – लोहार समाज्याच्या वतीने निषेध..

संबधितांवर फौजदारी कार्यवाई करण्याची तालुक्यातील सुतार - लोहार समाज्याची तहसीलदारांच्याकडे मागणी...

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव ता.१७ – देशात ऐकिकडे बारा बुलतेदारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी.एम विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ केला असताना तर दुसरीकडे नांदगाव तालुक्यातील गिरणागर येथील हनुमाननगर येथे बारा बुलतेदारांचे दैवत असलेल्या श्री प्रभू विश्वकर्मा महाराज मंदिराच्या कंपाउंड मध्ये काहींनी अनधिकृत प्रेवश करून बांधकाम तोडल्याची निंदनीय प्रकार घडल्याची घटना घडली असून सदर घटनेने जिल्हाभर निषेध व्यक्त केला जात असून संबधितांवर फौजदारी कार्यवाई करण्याची मागणी सुतार – लोहार संघटनेने तहसीलदारांकडे केली आहे.

निवेदनाद्वारे माहिती अशी कि नांदगाव तालुक्यातील सुतार – लोहार समाज्यासाठी काम करणारी नोंदणीकृत संस्था श्री विश्वकर्मा सुतार समाज बहुउद्देशिय विकास संस्था असून संस्थेने सुतार – लोहार समाज्याचें आराध्यदैवत श्री विश्वकर्मा महाराज मंदिर बांधकाम व इतर समाज उपयोगी कार्यासाठी संस्थेच्या मागणी प्रमाणे गिरणानगर ग्रामपंचायतीने सन २०१० ला ग्रामसभेच्या ठरानवे हनुमाननगर येथील सर्वे नं २५२/२ चा अ- ब- क मधील जागा देण्यात आली व तसा ८ नंबर चा उतारा ही देण्यात आला आहे या जागेवर संस्थेने तालुक्यातील सुतार -लोहार समाज बांधवांच्या मददतीने स्वखर्चाने श्री विश्वकर्मा महाराज मंदिर व वाल कँम्पाउड केले आहे तसेच माजी खासदार हरींचंद्र चव्हाण यांच्या निधीतून व आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या आमदार निधीतून सभामंडप उभारले आहे तसेच इतर जागेवर भोजनालयचेसह इतर समाज उपयोगी कामे प्रस्तावित आहे या मंदिरात प्रभू विश्वकर्मा महाराजांची नित्यनेमानी,दररोज पूजा,आरती केली जाते तसेच या ठिकाणी श्री विश्वकर्मा महाराजांची जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हे सर्व असताना सोमवारी ता.१६ रोजी काहींनी संस्थेची जागा बळकवण्याच्या हेतूने मंदिराच्या कंपाउंड मधील बांधकामाची तोड-फोड करण्यात आली यामुळे श्री विश्वकर्मा संस्थेचे ७० हजाराचे नुकसान झाले आहे.ही घटना निंदनीय असून याचे तीव्र पडसाद जिल्हाभरात पडले असून या घटनेमुळे जिल्ह्यातील सुतार -लोहार,समाज्यासह बाराबुलतेदार दुःखी झाला आहे या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत असून संबधीत जागेवरील सुरू असलेले काम त्वरित थांबावे व संबधीतांवर फौजदारी कार्यवाही करावी अन्यथा तालुक्यातील समस्त सुतार -लोहार,समाज्याच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे..

नांदगाव / हनुमाननगरमधील श्री विश्वकर्मा महाराज मंदिर वाल कंपाउंड मधील बांधकाम तोडल्याच्या निषेधार्थ संबंधितांवर कारवाई करणायचे निवेदन तालुक्यातील सुतार-लोहार संघटनेच्या वतीने तहसीलदार डॉ सिध्दार्थ मोरे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांना देताना संघटनेचे पदाधिकारी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.