ताज्या घडामोडी

जनतेच्या मूलभूत, सार्वजनिक समस्या सोडविणे हे आमचे कर्तव्य : समाजसेविका अंजुमताई कांदे

गिरणानगर ( वडाळकर वस्तीवर ) आमदार निधीतून विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव ता. – नांदगाव तालुक्यातील गिरणानगर ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वस्तीवर (वडाळकर वाडा) आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन मंगळवारी ता.१७ रोजी समाजसेविका अंजुमताई कांदे यांच्या हस्ते संपन्न झाले.
नांदगाव तालुक्यातील गिरणानगर येथील आदिवासी वस्तीवरील (वडाळकरवाडा)ला समाजसेविका अंजुमताई कांदे यांनी भेट देत वस्तीवर महिला व नागरिकांशी संवाद साधला होता या भेटीत महिलांनीयांच्याकडे आरोग्य,पिण्याचे पाणी,स्वच्छता,रस्ते आदी विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबत गळ घातली होती.यावर तात्काळ.अंजुमताई कांदे यांनी आमदार सुहासआण्णा कांदे यांना माहिती दिली असता यावर आमदार सुहास आण्णा कांदे यांनी तात्काळ दाखल घेत वस्तीला सार्वजनिक शौचालय,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व सभा मंडप आदी कामांसाठी मूलभूत सुविधांतर्गत पंचवीस लाखाचा निधी उपलब्ध करून दिले.मंगळवारी या विकासकामांचे भूमिपूजन समाजसेविका अंजुमताई कांदे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी अंजुमताई कांदे म्हणाल्या आपल्या कुठल्याही स्वरूपाच्या सार्वजनिक मूलभूत स्वरूपाच्यासमस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,आपल्या समस्या सोडवणे हे आमचे कर्तव्य आहे,आपण निश्कोच आमच्याशी संपर्क करू शकता असा विश्वास त्यांनी उपस्थित महिलांना यावेळी दिला.या प्रसंगी.रोहिणी मोरे,भारती ताई बागोरे,सरपंच अनिता पवार,पल्लवी सोमासे,अॅड. विद्या कसबे,संध्या पवार,निराली वाघ,रेणुका बाहिकर,नम्रता सांबरे,राधा सांबरे,वैशाली पडवळ,राहुल पवार,अनिल,आदींसह नागरिक उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.