ताज्या घडामोडी

नांदगावी अमृतकलश यात्रा

केंद्रीय राज्यमंत्री ना.भारतीताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेरी मिट्टी " मेरा देश" अभियान संपन्न

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा
नांदगाव ता.२० नांदगावला ” मेरी मिट्टी ” मेरा देश मेरा” अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.केंद्रीय मंत्री नामदार भारतीताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.गँगाधरी ते पंचायत समिती पर्यंत शोभयात्रा काढण्यात आली या यात्रेत लेझिम पथक,भजनी मंडळ यांच्या गजरात चिमुकल्यांनी लक्ष वेधले,

.यावेळी मराठा महासंघाच्या वतीने विशाल वडघुले,भीमराज लोखंडे सह काही कार्यकर्त्यांनी यांनी स्टेज समोर येऊन आम्हाला बोलायचं आहे. मराठा आरक्षण मागणीसाठी सरकारला दिलेल्या आल्टीमेट नुसार चार दिवस बाकी आहे यावर तुमची केंद्र सरकारकडे काय भूमिका मांडणार आहे, ती स्पष्ट करावी नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त तालुक्यातुन वगळण्यात आले आहे यावर विषयी तुमचे मत सांगावे हे मंत्री भारतीताई पवारांना विचारले व संतप्त होत काळे झेंडे दाखवत ” एक मराठा लाख मराठा ” घोषणाबाजी केली आम्हाला आरक्षण केव्हा मिळणार केंद्राची आरक्षणाबद्दल काय भूमिका अशी विचारणा केली,पोलिसांनी यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या मराठा महासंघाच्या कार्यकर्तेना ताब्यात घेतले .

नांदगाव तालुका दुष्काळी जाहिर करण्यासाठी नक्कीच मी पूर्णपणे प्रयत्न करेल असे यावेळी मंत्री भारतीताई पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले यावेळी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी देखील आरक्षण संदर्भात निवेदन दिली….

यावेळी तहसिलदार डॉ सिध्दार्थ मोरे,गटविकास अधिकारी गणेश चौधरी .भाजपा जेष्ठ नेत्या जयश्रीताई दौंड,सजन तात्या कवडे,गणेश शिंदे आदी उपस्थित होत

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.