ताज्या घडामोडी

मुंबईतील राष्ट्रवादीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवारांशी नांदगाव तालुक्यातील दुष्काळाची चर्चा

सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांना ट्विट

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा
नांदगाव,ता. २२ : दुष्काळ जाहीर करावा,ही दुर्दैवी मागणी जनता हौस म्हणून करीत नसते.दुष्काळ जाहीर होण्यासाठी असलेली प्रतिकूल परिस्थिती व शास्त्रीय निकष या सर्व बाबींमध्ये नांदगाव तालुका तंतोतंत बसत असतानाही शासनाने ट्रिगर- २ अंतर्गत नांदगावचा समावेश केला नाही,ही बाब मुंबई येथे तालुक्यातील ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडली.कांदा अनुदान,शेतीमालाचे घसरलेले भाव,निर्यातशुल्क,जीवनावश्यक वस्तूंची महागाईवर चर्चा करून जनतेला न्याय मिळावा,असे गाऱ्हाणेही त्यांच्याकडे मांडले.मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन,येथे लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत नांदगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी सादरीकरण केले.त्याची दखल घेत ! खासदार सुप्रिया सुळे यांनी बैठक सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांना टॅग करीत ट्विट केले,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही नांदगावच्या दुष्काळाबाबत चिंता व्यक्त करीत शासनस्तरावर सर्वोतपरी सहकार्य करण्याचे मान्य केले. दुष्काळाबाबत नांदगाव तालुका राष्ट्रवादीकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.खासदार सुप्रिया सुळे.यांनी दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे !यांच्याकडे दुष्काळासंदर्भात योग्य कारवाई करण्यासाठीतातडीने ट्विट केले व नांदगावच्या दुष्काळाबाबत संसदेत आवाज उठविला जाईल असे शिष्टमंडळाला आश्वासित केले.दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून 5 नांदगावला वगळण्यात आले आहे.अवर्षणामुळे शेतकऱ्यांची स्थिती अतिशय वाईट आहे.हे लक्षात घेता या तालुक्याचा फेरअहवाल जिल्हा दुष्काळ देखरेख समितीमार्फत मागवून तो मंजूर करून घेण्याची गरज आहे. याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी वैयक्तिक लक्ष घालून सकारात्मक कार्यवाही करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दे या ट्विटद्वारे केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.