ताज्या घडामोडी

नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्दला सरोदे वस्तीवर धाडसी दरोडा

तीन लाखांचा मुद्देमाल नेला चोरून

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव ता२३ : तालुक्यातील जळगाव खुर्द येथील सरोदे वस्तीवरील सैनिक विक्रांत अप्पा सरोदे यांच्या घरी धाडसी दरोडा पडला असून, चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत लहान मुले व महिला जखमी झाल्या आहे. चोरट्यांनी ३ लाख २३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला.दरोडा पडल्याने परिसरात नागरिकांच्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सरोदे वस्तीवर शुक्रवारी (दि.२०) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हा दरोडा पडला. सरोदे वस्तीवर चोरांनी पहिल्यांदा शेळीची मान पिळल्याने शेळीने मोठ्याने आरडाओरडा केल्याने माजी पोलिस पाटील अप्पा सरोदे हे घराबाहेर येताच दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला.झोपेत असताना दतात्रय सजन डोखे,मनीषा डोखे,तान्हाबाई डोखे व लहान मुलांना जबर मारहाण करत दहशत निर्माण केली.घरातील ४तोळे १९ ग्रॅम सोने,तसेच रोख रक्कम एकूण असा ३ लाख २३ हजार ३०० रुपयांचा ऐवज अज्ञात दरोडेखोरांनी लुटल्याची नोंद करण्यात आली आहे.या दरोड्यातील दरोडेखोर २५ ते ३० वयोगटातील आहे. घटनेचे वृत्त कळताच नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक शहाजी उमाप,अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती,उपविभागीय अधिकारी सोहल शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.याप्रकरणी पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल केला.पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी,सहायक पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे,पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे,गोपनीय शाखेचे आंबलदार अनिल शेरेकर,हवालदार गोसावी,शेख पुढील तपास करीत आहेत.तालुक्यातील दरोड्यामुळे नागरिकांच्या मनात दहशत पसरली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.