ताज्या घडामोडी

ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन

विठूभक्तीची शेकडो वर्षांची परंपरा जपणारे बाबा महाराज

गर्जा महाराष्ट्र24 न्युज वृत्तसेवा

नवी मुंबई : ता २६ देशातील प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी नवी मुंबईती नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.ज्येष्ठ कीर्तनकार अशी त्यांची जगभरात प्रचिती होती.त्यांनी वारकरी संप्रदायाच्या सेवेची सव्वाशे वर्षांची परंपरा जपली होती.बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी ता.२७ रोजी संध्याकाळी ५ वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी तीननंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येईल.

जेष्ठ निरुपणकार ह.भ.पा बाबा महाराज सातारकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं.रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचं व्रत होतं.कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं.यावर्षीच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचं निधन झालं होतं.त्यानंतर ८ महिन्यानंतर बाबा महाराज सातारकर यांचीही प्राणज्योत मालवली.

बाबा महाराजां बद्दल….

शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदयाची परंपरा जोपासली ◆◆◆◆
बाबा महाराज सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी साताऱ्यात झाला. त्यांचे त्या काळी दहावीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं. बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे.

विठोबा – ज्ञानोबासाठी आयुष्य●●●●

विठ्ठलाचे कीर्तन आणि ज्ञानेश्वरी यावर बाबा महाराजांनी आयुष्य घालवलं. बाबा महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी राज्यातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त जमत होते. अलिकडे वय झाल्यामुळे बाबा महाराज कीर्तनासाठी उभे राहात नव्हते. त्यांची ही परंपरा त्यांचा नातू पुढे नेत आहे.

बाबा महाराजांचा जीवन परिचय◆◆◆

नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे उर्फ ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकरांच्या घरात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची आणि प्रवचनाची परंपरा जोपासली जातेय. बाबा महाराजांनी हीच परंपरा पुढे सुरू ठेवली. बाबा महाराजांचे वडील ज्ञानेश्वर दादा महाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. चुलते आप्पा महाराज आणि अण्णा महाराज यांच्याकडून बाबा महाराज सातारकरांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचं शिक्षण घेतलं.अन् वयाच्या चौथ्या वर्षी कीर्तनाची चाल गायली..वयाच्या आठव्या वर्षांपासून बाबा महाराज श्री सद्गुरू दादाम हाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणायचे. तिथूनच त्यांवर कीर्तनाचे संस्कार रुजत गेले.वयाच्या अकराव्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबवा,आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडेही घेतले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.