ताज्या घडामोडी

नांदगावला मराठा आरक्षण साखळी उपोषनाला वाढता पाठिंबा

तालुक्यातील विविध गावात राजकीय नेत्यांना गावबंदीचे फ्लेस्क सोशल मीडियावर झळकले

गर्जा महाराष्ट्र24 वृत्तसेवा

नांदगाव ता.२६ मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनास प्रतिसाद देत नांदगावला जुन्या तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वार रविवारी ता २२ पासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली असून या आंदोलनाला तालुक्यातील विविध गावांमधील मराठा समाज्यासह इतर समाज व सामाजिक संघटनेचा वाढता पाठिंबा मिळत आहे.

या साखळी उपोषणस्थळी गुरुवारी ता.२६ रोजी मोठ्या प्रमाणावर तालुक्यातील गावांमधील नागरिक पाठींबा देत आहे,गुरुवारी मनमाड मधील महिलांचा मोठा ग्रुप उपोषणस्थळी भेट दिली व उपोषणकर्ते व्याच्याशी चर्चा करत साखळी उपोषणामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे शनिवारी २८ अक्टोंबर ला तालुक्यातील मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव जमा होत शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले जाणार आहे .नांदगाव तालुक्यातील तमाम मराठा समाज बांधवांनी आणि मराठा आरक्षण समर्थकानी आपल्या मुलांच्या पुढील भविष्यासाठी मराठा आरक्षण आमरण साखळी उपोषणात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन उपोषणकर्ते विशाल वडघुले यांनी केले आहे तालुक्यातील प्रमुख साकोरा,माणिकपुंज,मोरझर, चांदोरे, सावरगाव, लक्ष्मीनगर या गावानी उपोषणाला पाठींबा देत राजकीय नेत्यांना गावबंदीचे फ्लेक्स सोशल मीडियावर झळकले आहेत.

तसेच मराठा आरक्षण मागणीच्या समार्थ माजी आमदार संजय पवार यांनी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाचा राजीनामा दिल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे,मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सरकार काय पावले उचलतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.