ताज्या घडामोडी

नांदगावला मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक..

आंदोलकांनी दिल्या सरकार विरोधी घोषणा...

गर्जा महाराष्ट्र24 न्युज वृत्तसेवा

नांदगाव ता.२८ नांदगावला मराठा समाज आरक्षण मिळण्यासाठी २२ अक्टोंबर पासून गेल्या सात दिवसांपासून साखळी उपोषणास बसले असून शनिवारी ता.२८ रोजी सकाळी ११ वाजता अखिल भारतीय मराठा महासंघ व सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने जमत हुतात्मा स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून आमरण उपोषण सुरु केले.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी ” या सरकारच करायच काय “, शिंदे सरकारच करायच काय ” खाली डोकं वर पाय, एक मराठा ” लाख मराठा, तुमचं आमचं नातं काय ” जय जिजाऊ,जय शिवराय ” कोण म्हणतं ‘ देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही ” आदी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली यावेळी जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे यांनी आंदोलनाला आपला पाठींबा दर्शवित आपले मनोगत व्यक्त केले

आंदोलनस्थळी विविध ठराव पास करण्यात आले
१)नांदगाव तालुक्यातील प्रत्येक गावात सत्ताधारी / आमदार,खासदार यांना गावात प्रवेश बंदी करणे २) तालुक्यात राजकीय आणि शासकीय कार्यक्रमास आरक्षण मिळेपर्यंत मनाई करणे ३) तालुक्यातील प्रत्येक गावात हनुमान मंदिरात साखळी उपोषण सुरू करणे, ४) शासनाच्या कोणत्याही विभागाची मराठा समाज्याच्या व्यक्तीच्याकडून थकबाकी भरणा मागितला जात असेल तर सदर व्यक्तीने सदर विभाग / अधिकारी, कर्मचाऱ्यांना पत्राद्वारे कळविणे की आम्हास मराठा आरक्षण मिळल्यानंतर च बाकी भरण्यात यईल ५) तालुक्यातील विविध राजकीय पक्षातील सर्व मराठा समाज्याच्या पदाधिकाऱ्यांना सामुदायिक राजीनामा देण्यास जाहीर आव्हान करणे ६) मराठा आरक्षण आंदोलनात पुढील टप्यात प्रत्येक दिवशी रोज एक शासकीय कार्यालय आरक्षण मिळेपर्यंत बंद करणे ७) तालुक्यातील मराठा समाज्याच्या लोकप्रतिनिधींना राजीनामा देण्यास जाहीर आवाहन करणे ८) नांदगाव शहर बंद ची तारीख सर्वानुमते ठरविणे..शनिवार ता.२८ पर्यंत तालुक्यातील मांडवड, मोरझर,जोंधळवाडी,धोटाने खु,मोहेगाव,चांदोरा,आमोदे, पिंपरखेड,दहेगाव,न्यायडोंगरी, परधडी,भालूर,पळाशी,डॉक्टरवाडी, साकोरा,आनकवाडे,आदी गावात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आल्याचे कळविले आहे ,, या वेळी विविध राजकीय पक्ष संघटना, समाज, सामाजिक संघटनेने उपोषणास जाहीर पाठींबा दिला आहे

मराठा आरक्षणावर सुरू असलेल्या साखळी उपोषणाला मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे तालुका संचालक तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमित बोरसे पाटील,यांनी भेट घेत मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने जाहीर पाठींबा चे पत्र दिले

उपोषणकर्ते विशाल वडघुले यांनी ही आम आदमी पक्षाच्या आपल्या पदाचा राजीनामा यापूर्वीच दिल्याचे सांगितले आहे



शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेना तालुका अध्यक्ष निलेश चव्हाण, संतोष जगताप (उबठा )नांदगाव संघटक, अमोल पाटील बाभुळवाडी, डॉक्टरवाडी गावाच्या सरपंचांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे . शनिवार रोजी उपोषणस्थळी तालुक्यातील हजारोच्या वर समाज बांधवांनी प्रत्यक्ष हजेरी लावत उपोषणाला पाठींबा दिला आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.