ताज्या घडामोडी

केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! कांदा निर्यातीवर अघोषित बंदी ?

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार मोठा फटका

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नाशिक ता .२९ : देशात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या बाजार भावात सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे.विशेषतः नवरात्र उत्सवानंतर कांद्याच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत.शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांदा संपत आला असल्याने आणि नवीन हंगामातील लाल कांदा आवक देखील दबावात असल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाही.यामुळे सध्या कांद्याच्या किमती वाढत असल्याचे चित्र आहे.
खरंतर लाल कांद्याचे उत्पादन कमी राहणार असा अंदाज आहे.यामुळे आगामी काळात बाजार भाव आणखी कडाडणार असे चित्र निर्माण तयार होत आहे.जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे,नवरात्र उत्सवात कांद्याची मागणी कमी होती.पण आता नवरात्र उत्सव संपला आहे यामुळे कांद्याची मागणी पुन्हा एकदा वाढत आहे.देशांतर्गत कांद्याची मागणी विक्रमी वाढली असून याचा परिणाम म्हणून सध्या दरात तेजी आली आहे.घाऊक बाजारात तसेच किरकोळ बाजारात देखील कांद्याच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत.यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळत आहे तर सर्वसामान्यांचे बजेट बिघडत आहे.सर्वसामान्य कांद्याच्या किमतींवरून सरकारवर नाराज आहेत. राज्यातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला तब्बल साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे.यामुळे कांद्याच्या किरकोळ बाजारात किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने काल कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी एक मोठा निर्णय घेतला आहे.केंद्र शासनाच्या केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या विदेशी व्यापार व्यवहार विभागाने काल शनिवारी अर्थातच २८ ऑक्टोबर रोजी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार आता येथून पुढे भारत देशातून कांदा निर्यात करण्यासाठी प्रत्येक टनामागे ८०० अमेरिकन डॉलर एवढे निर्यात मूल्य आकारले जाणार आहे. यामुळे परदेशी खरेदीदारांना आता पूर्वीच्या ४०० डॉलरच्या तुलनेत दुप्पट निर्यात शुल्क देऊन कांदा खरेदी करावा लागणार आहे. हा निर्णय ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू राहणार आहे.पण बंगळूरू रेड रोज, तसेच कृष्णपुरम या कांद्यासाठी हा निर्णय लागू राहणार नाही.मात्र जाणकार लोकांनी या निर्णयाचा कांदा बाजार भावावर विपरीत परिणाम होणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे. पण शेतकरी संघटनांच्या माध्यमातून ही अप्रत्यक्षरीत्या करण्यात आलेली कांदा निर्यात बंदी आहे असा आरोप केला जात आहे.मात्र यावर्षी पावसाचे उशिराने आगमन झाले यामुळे कांद्याची लागवड लांबली होती. शिवाय मध्यंतरी पावसाचा मोठा खंड पडला होता यामुळे यंदा कांद्याचे उत्पादन उशिराने बाजारात दाखल होणार आहे आणि उत्पादनात सुद्धा मोठी घट येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.या व्यतिरिक्त उन्हाळी कांदा देखील आता संपत आला आहे.यामुळे या निर्णयाचा कांदा बाजार भावावर फारसा विपरीत परिणाम होणार नाही असे मत व्यक्त होत आहे.काही कांदा व्यापाऱ्यांनी आणखी एक महिना तरी बाजारभाव तेजीत राहतील असा अंदाज व्यक्त केला आहे.म्हणजे जोपर्यंत नवीन हंगामातील लाल कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येत नाही तोपर्यंत दरातील ही तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.यामुळे शेतकऱ्यांनी गोंधळून न जाता गरजेनुसार कांदा विक्री करावा आणि एकाच वेळी बाजारात कांदा विक्रीसाठी आणू नये असे आवाहन कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून केले जात आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.