ताज्या घडामोडी

नांदगावला आमदार सुहासआण्णा कांदेच्या वतीने कीर्तनकारांचा सन्मान सोहळा

मतदारसंघातील भजनी मंडळांना साहित्य भेट

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव,ता ३१ आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या संकल्पनेतून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील प्रत्येक भजनी मंडळांना भजन साहित्य वाटप करण्याचा सुंदर असा कार्यक्रम सोमवारी 30 तारखेला नांदगाव येथे गुप्ता लॉन्स च्या प्रांगणात अतिशय उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात हजारोच्या संख्येने वारकरी उपस्थितीत संपन्न होते यावेळी महाराष्ट्रातील ख्यातनाम निरुपणकार हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी निरूपण केले

सोमवारी नांदगाव येथील गुप्ता लॉन्सवर तालुक्यासह मतदारसंघातील वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार करणाऱ्या कीर्तनकारांचा सन्मानसोहळा मोठ्या दिखामत आयोजित करण्यात आला

त्यात महाराष्ट्रातील ख्यातनाम निरुपणकार हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी निरूपण करताना म्हणाले मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावी अशी राज्यभरातील वारकऱ्यांची मागणी असून वारकऱ्यांची दखल घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी दिवाळीचा बोनस म्हणून जाहीर केल्यास यंदाच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली

आमदार सुहासअण्णा कांदे यांच्या संकल्पनेतून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील प्रत्येक भजनी मंडळांना भजन साहित्य वाटप करण्याचा सुंदर असा कार्यक्रम आज नांदगाव येथे गुप्ता लॉन्स च्या प्रांगणात अतिशय उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमात हजारोच्या संख्येने उपस्थितीत कीर्तनकार संत साधू महाराजांचे आमदार सुहासआण्णा कांदे, सौ अंजुमताई कांदे यांनी पुरोहितांच्या मंत्रोपचारात श्री क्षेत्र काशी,प्रयागराज,हरिद्वार,देवप्रयाग,ऋषिकेश या तीर्थ स्थळावरून मागविण्यात आलेल्या अलकनंदा भागीरथी गंगा नद्यांचे पवित्र जल कलश सह संतांची कमल चरण सेवा संपन्न झाली सर्व कीर्तनकार महाराजांना पगडी वस्र व आदर्श वारकरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

O

वारकरी पूजन व भजन साहित्य वाटप कार्यक्रमाचे निमित्ताने परिसर अतिशय भक्तिमय झाले होते मंडपाच्या प्रवेशद्वारावर विठ्ठलाची प्रतिकृती उभारण्यात आली होती तसेच वारीचे कट आउट उभारण्यात आले होते का होते.एकशे अट्ठेचाळीस गावातील दोनशेहून अधिक भजनी मंडळांना आमदार कांदे यांनी स्वखर्चातून मृदंग टाळ वीणा उपलब्ध करून दिले ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या कार्याचा गौरव केला

या प्रसंगी वैराग्यमूर्ती तुकाराम महाराज जेऊरकर,जयराम बाबा गोंडेगावकर श्रावण महाराज अहिरे माधवगिरी महाराज नामदेव महाराज बोगीर रामकृष्ण महाराज बानगावकर दत्तात्रय महाराज बाळकृष्ण महाराज गुरुकुल सोमेश्वर आनंद महाराज जोंधळवाडीकर महाराज सर्व आखाड्यांचे महंत संत वारकरी संप्रदायातील कीर्तनकार गायनाचार्य व मृदंगाचार्य उपस्थितीत होते नंदकिशोर महाराज दौंड यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिसवळ चे उपसरपंच संजय आहेर यांनी केले तर आभार माजी सभापती विलासराव आहेर यांनी मानले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.