ताज्या घडामोडी

साखळी उपोषनाला पाठींबा देत डॉक्टरवाडी ग्रामस्थांची नांदगाव शहरात रॅली

तांदुळवाडीच्या भजनी मंडळाचे उपोषणस्थळी भजन गात रात्रजागर

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव,ता.३० मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरु असलेल्या आमरण उपोषणाला सोमवारी ता.३० रोजी नांदगाव तालुका सकल धनगर समाजाने पाठिंबा दिला.तसेच साखळी उपोषण व अमरण उपोषण ला सर्व डाँक्टरवाडी, बाभूळवाडी येथील ग्रामस्थ व महिला मोठ्या संखेने नादंगाव शहरात रँली काढत आंदोलनात सहभागी झाले…

मराठा समाज्याला आरक्षण मिळण्याच्या मुद्द्यांवर नांदगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने विशाल वडघुले, भिमराज लोखंडे व त्यांच्या सहका-यांचे सलग आठ दिवसापासून साखळी उपोषणानंतर चार दिवसापासून बेमुदत उपोषण सुरु आहे. जुन्या तहसीलजवळ सुरु असलेल्या बेमुदत उपोषणाला सोमवारी ता ३० रोजी नांदगाव तालुक्यातील सकल धनगर बांधवांच्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी जावून उपोषणकर्ते यांची भेट घेवून पाठिंबाचे पत्र दिले

यावेळी मनमाडचे माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे शिवसेनेचे नेते अलताफ(बाबा) खान यांनी उपोषणकर्ते यांच्याशी चर्चा केली. यावेळी. डॉ. गणेश चव्हाण, त्र्यंबक शेरमाळे सुनील सोर,शरद आयनोर, भिका खटके सुनिल मेगनर हिम्मत शिंदे आश्रु शिंदे सुभाष सरग संजय शिंदे आदी उपस्थित होते.मंगळवारी रात्री उपोषणस्थळी तांदुळवाडी गावातील भजनी मंडळांच्या वतीने भजन करण्यात आले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.