ताज्या घडामोडी

राज्यात ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर

नाशिक जिल्ह्यातील ३ तालुक्यांचा समावेश,

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

मुंबई ता.०१ राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कमी पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन,या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यास मंगळवारी ता.३१ रोजी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंगळवारी सायंकाळी ४० तालुक्यांत दुष्काळ घोषित करण्याचा शासन अध्यादेशही तातडीने काढण्यात आला आहे


त्याचप्रमाणे उर्वरित भागांमध्ये परिस्थिती पाहून महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात येणार आहे.राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे त्याबाबतीत आवश्यक ते निकष निश्चित केले जातील. तिथे दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून या मंडळांकरिता योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें
आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

दोन निर्देशांकांचा विचार

मदत व पुनर्वसन विभागाने पीक पाणी परिस्थितीच्या आढाव्यात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील परिस्थितीची माहिती दिली. यामध्ये ‘दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६’ मधल्यातरतुदीनुसार ‘अनिवार्य निर्देशांक’ आणि ‘प्रभावदर्शक निर्देशांक’ विचारात घेण्यात आले आहेत. राज्यात यंदा पावसात एकूण सरासरीच्या १३.४ टक्के घट आली असून रब्बी पेरण्या देखील संथपणे सुरू आहेत. आतापर्यंत केवळ १२ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

तीन हेक्टर मर्यादित मदत ●●●●

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर मर्यादित मदत करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जून ते ऑक्टोबर २०२३ या पावसाळ्यात अतिवृष्टी, पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार दोन हेक्टर मर्यादिऐवजी आता तीन हेक्टर मर्यादित राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने मदत करण्यात येईल. शेतजमिनीच्या नुकसानीसाठी दोन हेक्टर मर्यादित केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणारी मदत आता अल्पभूधारक शेतकरी नसलेल्यांनाही दोन हेक्टर मर्यादित मिळेल.

दुष्काळ घोषित करण्यात येत असलेल्या ४० तालुक्यामध्ये खालील सवलती लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे:-
१) जमीन महसुलात सूट.
२) पिककर्जाचे पुनर्गठन
(३) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती. (४) कृषी पंपाच्या चालू विजबिलात ३३.५% सूट.
५) शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी.
६) रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता.
७) आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर.
८) टवाई जाहीर केलेल्या गावात शेतकन्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे

गंभीर स्वरूपाचा दुष्काळ◆◆◆◆
●नंदुरबार : नंदुरबार ●जळगाव :चाळीसगाव ●जालना : ●भोकरदन,जालना,बदनापूर,अंबड,मंठा
●छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर,सोयगाव ●नाशिक : मालेगाव,सिन्नर,येवला ●पुणे : पुरंदर.सासवड,बारामती ●बीड : वडवणी,धारूर,अंबाजोगाई ● लातूर : रेणापूर ● धाराशिव :वाशी, धाराशिव,लोहारा,● सोलापूर: बार्शी,माळशिरस,सांगोला

मध्यम स्वरूपाचा दुष्काळ◆◆

•●धुळे :शिंदखेडा •● बुलडाणा: बुलडाणा, लोणार● पुणे: शिरूर घोडनदी, दौड, इंदापूर ● सोलापूर: करमाळा, माढा ● सातारा वाई, खंडाळा ●कोल्हापूर हातकणंगले, गडहिंग्लज ●सांगली : शिराळा, कडेगाव, खानापूर विटा,मिरज

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.