ताज्या घडामोडी

आमदार सुहासआण्णा कांदे यांची नांदगांव तालुका दुष्काळ जाहीर होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव

नांदगाव मतदारसंघातील गावांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश होण्यासाठी प्रस्ताव तयार करा मुख्यमंत्री शिंदे यांचे मदत व पुनर्वसन विभगाला आदेश

गर्जा महाराष्ट्र24 न्युज वृत्तसेवा

मुंबई ता.०१ : राज्यसरकारने ४० तालुके दुष्काळी घोषित केले असताना यात नाशिक जिल्ह्यांतून मालेगांव,सिन्नर,येवला तालुक्यासोबतच नांदगाव तालुक्याचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश अपेक्षित असतांना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नांदगावला वगळण्यात आले आहे. नांदगाव तालुक्याचा तात्काळ दुष्काळ तालुक्याच्या यादीत समावेश करावा,अशी मागणी नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे मंत्रालयात बुधवारी (ता.०१ ) रोजी भेट घेऊन केली आहे.

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मागणीप्रमाणे तातडीने नांदगाव तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत निकषानुसार प्रस्ताव तयार करून सादर करावा,असे आदेश शासनाच्या मदत व पुर्नवसन विभागाला मुख्यमंत्री एकनाथ. शिंदे यांनी दिले आहे.आमदार सुहास आण्णा कांदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,ट्रिगर १, ट्रिगर-२ या उपाययोजनांमध्ये नांदगाव तालुका बसत असतांना देखील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नांदगाव तालुक्याला वगळण्यात आले आहे.नांदगाव मतदारसंघातील नांदगाव व मालेगांव तालुक्यात अत्यंत कमी म्हणजे १८६.३ मिमी पाऊस झाल्याने तालुक्याची आणेवारी ३६ पैशांपर्यंत आहे. तर पावसाअभावी टंचाईग्रस्त ३४ गावे व १५० वाडया वस्त्यांसाठी दररोज टँकरच्या ८३ फेन्या सुरू आहेत.खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये नांदगाव तालुक्यांत प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले असून तालुक्यांतील सर्व आठही महसूल मंडळांमध्ये अपेक्षित सरासरी उत्पादकता २५ टक्क्यांपेक्षा कमी आली होती. मका, कापूस, बाजरी सोयाबिन, कडधान्य पिकांचे होणारे नुकसान हे ७५ ते८० टक्क्यांपेक्षाही जास्त. दिसून आल्याने हे क्षेत्र पावसाअभावी करपले आहे व मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
जनावरांना चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे.. धरणे, तलाव, बंधारे न भरल्याने पिण्याचे पाणी समस्या उदभवली आहे रब्बी हंगाम देखील वाया जाणार असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. वरील वस्तुस्थिती असतांना ट्रिगर-१ व ट्रिगर -२ च्या उपाययोजनांमध्ये नांदगाव बसत असताना देखील प्रशासनागच्या हलगर्जी व दुर्लक्षामुळे नांदगाव मतदारसंघावर अन्याय होत असल्याची भावना जनतेत निर्माण होवून असंतोष पसरला आहे.त्यामुळे नांदगाव मतदार संघाचा राज्य शासनाच्या मदत व पुर्नवसन विभागाने घोषित केलेल्या उपाय योजनांत समावेश करण्यात येवून तालुका दुष्काळी जाहिर करण्यात यावा अशी असाही मागणी आमदार सुहास आण्णा.कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.