ताज्या घडामोडी

आशा ना ७ हजार तर गट प्रवर्तक ना ६२०० मानधन वाढ २ हजार रूपये बोनस देण्याचा निर्णय !!

गट प्रवर्तक, आशा संप बाबत आरोग्य मंत्री सोबत संघटनेची सकारात्मक चर्चा : गट प्रवर्तक मागणी पूर्ण न झाल्यास संप सुरुच राहणार

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

मुंबई: ता.०१ राज्यभरात आशा व गटप्रवर्तक यांचा विवीध मागण्यांसाठी राज्यव्यापी १८ ऑक्टोबर पासुन संप सुरु होता. आज मुंबई येथे राज्याचे आरोग्य मंत्री ना.तानाजी सावंत,आयुक्त धीरजकुमार आरोग्य अभियान,आरोग्य प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर,आरोग्य अतांत्रिक संचालक सुभाष बोरकर यांच्यासोबत आशा गट प्रवर्तक यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा कृती समिती पदाधिकारी यांनी केली.
या बैठकीत आरोग्य मंत्री यांनी आशा ना दरमहा ७ हजार रूपये मानधन वाढ करण्यात येईल.तसेच गट प्रवर्तक ना ६२०० रू.वाढ करण्यात येईल.तसेच दीपावली भाऊबीज भेट २ हजार देण्यात येईल. तसेच आशा ना मोबाईल रिचार्ज भत्ता १०० रू.वरून ३०० रु.जननी सुरक्षा योजना मध्ये सरसकट लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. २०१८ पासून केंद्र सरकार ने आशा गट प्रवर्तक ना मोबदला वाढ दिली नाही.त्या बाबत राज्यसरकार केन्द्र सरकार ला केंद्राने मोबदला वाढ द्यावी.अशी शिफारस करेल.आरोग्य वर्धिनी चा लाभ गट प्रवर्तक सुद्धा मिळेल,आँनलाईन काम सक्ती न करता करता प्रोत्साहित करावेत या निर्णयाचे कृती समिती स्वागत करत आहे.
मात्र गट प्रवर्तक गेलीं १८वर्ष फक्तं प्रवास भत्ता वर काम करत आहे. कंत्राटी ऑर्डर असून सुद्धा सामाजिक सुरक्षा लागू नाही. त्यांना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्या व त्या प्रमाणे वेतन लागू करा,उच्च शिक्षित गट प्रवर्तक ना किमान वेतन द्या,यासाठी कृती समिती आग्रही आहे. शासनाने गट प्रवर्तक ना न्याय द्यावा अशी विनंती शासनास करित आहोत.गट प्रवर्तक मागणी पूर्ण होई पर्यंत संप सूरू राहील असा निर्णय घेण्यात आला.बैठकीस कृती समिती चे कॉ राजू देसले,शंकर पुजारी, दिलिप उटाणे,एम ए पाटील,आनंदी अवघडे,भगवान देशमुख,सुवर्णा मेतकर,प्रतिभा कर्डक,अर्चना गडाख,सुवर्णा गांगुर्डे,माया घोलप,सुवर्णा लोहकरे,सुरेखा खैरनार,सविता हगवणे,पाटील उपस्थित होते आदि उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.