ताज्या घडामोडी

हिसवळ बुद्रुक ला कँडल मार्च काढत मराठा आरक्षण आंदोलनाला पाठींबा

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव ता. १ तालुक्यातील हिसवळ बुः येथे भव्य कॅडल मार्च आयोजित करुन गावात ज्ञानेश्वर माऊली मंदिरापासून फेरी काढण्यातआली त्यात गावगाड्यातील सर्व समाजातील आलुतेबलुतेदार १८ पगड जातीचे समाज एकत्र येऊन मराठा आरक्षणास पाठिंबा देण्यात आला.

या प्रसंगी शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, एक मराठा कोटी मराठा, कोण म्हणत देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही,आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं. अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे गावात एकच नाद घुमला. सदर फेरीची सांगता पुन्हा ज्ञानेश्वर माऊली मंदिरात झाली.

प्रसंगी अनेक मान्यवरांचे मराठा आरक्षणावर भाषणे झाली. सूत्रसंचालन जितेंद्र देशमुख यांनी केले. तर निलेश (फौजी) देशमुख यांनी आभार मानले. त्याप्रसंगी गावातील सरपंच शांताराम पवार, उपसरपंच आण्णा बिन्नर, सामाजिक कार्यकर्ते भैय्यासाहेब देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य फकीरा जगताप, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक बोगीर साहेब,माजी सरपंच बाळासाहेब बेंडके, माजी सरपंच शांताराम करवर,माजी चेअरमन श्रावण भालेराव, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण बोगीर, ग्रामपंचायत सदस्य रोहन फटांगरे, निलेश देशमुख, जवान देशमुख, जितेंद्र देशमुख, ज्ञानेश्वर भालेराव, गोरख भालेराव, निवृत्ती देशमुख, रावसाहेब बापु देशमुख, योगेश देशमुख, गणेश देशमुख, अमोल देशमुख, नितीन देशमुख, चेतन देशमुख, विशाल देशमुख, सोनू देशमुख जितेंद्र भालेराव व गावातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.