ताज्या घडामोडी

वारसाहक्काने पालिकेच्या सेवेत सामावून घेण्यासाठी बेमुदत उपोषण,पालकमंत्री दादा भुसे यांची शिष्टाईमुळे उपोषण मागे

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नांदगाव,ता ३ नांदगाव नगरपालिकेत वाल्मीकी,मेहतर,भंगी या समाजाला वारसाहक्काने नोकरी देण्याबाबत दिवाळी नंतर मुंबईला कामगार संघटनांच्या नेत्यांची बैठक घेऊन तोडगा काढणार असल्याच आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्याने गेल्या दोन दिवसापासून पालिका कार्यालयाबाहेर सुरु असलेले बेमुदत उपोषण स्थगित करण्याचा निर्णय उपोषणार्थीनी घेतला भारतीय मजदूर संघाशी संलग्नित नपा मनपा कर्मचारी महासंघाचे प्रदेश मार्गदर्शक श्रावण जावळे यांनी या उपोषण प्रश्नावर पालकमंत्री भुसे यांची भेट घेत त्यांचे लक्ष वेधले होते पालकमंत्र्यांनी मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेले उपोषण तूर्त स्थगित करण्यात आले

वाल्मीकी, मेहतर, भंगी या समाजाला वारसाहक्काने नोकरी देण्यात यावी असा न्यायालयाचा आदेश असताना सुध्दा नोकरी मिळत नाही व प्रलंबित मागण्यांसाठी वारसदार, कुटुंबातील घटक, सर्व सेवानिवृत्त कर्मचारी यांचे पालिका कार्यालयाबाहेर बेमुदत आमरण उपोषण सुरु होते आज उपोषणाचा दुसरा दिवस होता त्यातील रणजित आहिरे,बापू भालेकर,प्रदीप भालेकर या तिघा उपोषणार्थीची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केलेत
जेष्ठ नेते नागसेन चव्हाण यांनीही उपोषणार्थीची भेट घेत त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेत पालिका प्रशासनाला तोडगा काढण्याचे आवाहन केले होते यापूर्वीही या प्रश्नावर उपोषणे करून पदरात काहीच पडत नसल्याचे या उपोषणार्थीच्या कुटूंबियांची म्हणणे आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून कार्यालयाकडुन पालिका प्रशासनाला मार्गदर्शन प्राप्त झाले नाही त्यामुळे वारसाहक्काने नियुक्ती मिळण्यासाठी पालिकेला मार्गदर्शन करण्याचे पत्रच दिले नसल्याने उपोषणावर व आतापावेतो झालेल्या आंदोलनातून तोडगा निघू शकलेला नाही भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय सानप आनंद शिंदे राजाभाऊ गूढेकर किरण फुलारे विकी पेवाल,यावेळी उपस्थितीत होते माजी नगराध्यक्ष अरुण पाटील शिवसेना उबाठा चे तालुकाप्रमुख संतोष गुप्ता काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज चोपडे यांनी उपोषणाला पाठींबा दिला होता

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.