ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या प्रश्नावर प्रशासनाने अटी शर्थी पूर्ण करून तालुका जाहीर करावा :-गणेश धात्रक

शिवसेना उबाठा गटाचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव,ता ३ दुष्काळाच्या यादीत नांदगावच्या समावेश झाला नसल्याचे खापर प्रशासनावर फोडण्यात येत असले तरी प्रशासनाने आपल्यावरील फोडण्यात आलेले खापर पुसण्याचे काम करावे आणि प्रशासनाने नांदगाव तालुका दुष्काळी होण्यासाठी चांगले काम करावे व तसे काम झाले नाही तर शिवसेनेला यापेक्षा मोठे आंदोलन करावे लागेल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी शुक्रवारी दिला

शिवसेना उबाठा गटाच्या वतीने आज तालुक्यात दुष्काळ घोषित करावा या मागणीसाठी गणेश धात्रक यांच्या नेतृत्वाखाली नव्या तहसील कार्यालयावर मोर्चा आणण्यात आला आक्रमक मोर्चेकऱ्यांनी तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या दालनाबाहेर नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर झालाच पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आदी जोरदार घोषणाबाजी करीत कार्यालयीन परिसर दणाणून सोडला यानंतर घोषणाबाजी ऐकत तहसीलदार डॉ सिध्दार्थ मोरे हे दालनाबाहेर आले व ते मोर्चेकऱ्यांना सामोरे जात त्यांनी निवेदन स्वीकारले

नांदगाव तालुक्यातील दुष्काळ संबंधीच्या ज्या अटीशर्तींची पूर्तता प्रशासनाने केली नसेल तर ती पूर्ण करून घ्यावे असे आवाहन करताना श्री धात्रक यांनी प्रशासनाने ठरविले तर चांगले काम उभे राहू शकते शिवाय या ठिकाणी कुण्या एका माणसाला न्याय द्यायचा नसून तालुक्यातील दुष्काळग्रस्त जनतेला न्याय द्यायचा आहे असे सांगताना धात्रक यांनी राजकारण्यांपेक्षाही चांगले काम प्रशासन करीत असल्याबद्दल यावेळी आपल्या भाषणात समाधान व्यक्त व्यक्त करतांना तहसीलदारांकडून चांगल्या कामाची अपेक्षा व्यक्त केली तालुका प्रमुख संतोष गुप्ता यांचेही यावेळी आक्रमक भाषण झाले जिल्हा समन्वयक सुनील पाटील जिल्हाध्यक्ष संतोष गुप्ता तालुकाप्रमुख बाजार समितीचे उपसभापती कैलास भाबड उपसभापती माधव शेलार शहर प्रमुख श्रावण आढाव शहर प्रमुख शशिकांत मोरे उप तालुकाप्रमुख संदीप जगताप संतोष जगताप शिवाजी वाघ अनिल दराडे बाळासाहेब चव्हाण कविता छाजेड रेणुका जयस्वाल मुक्ताबाई नलावडे लता कळमकर प्रेरणा गायकवाड वृषाली आहेर आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते दुष्कळाच्या प्रश्नावर शिवसेनेचा मोर्चा येणार म्हणून तहसील बाहेर दुष्काळाच्या प्रश्नावर स्वतः बेमुदत उपोषण करीत असलेल्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी मोर्चेकऱ्यांसाठी चहापाण्याची व्यवस्था करून दिली

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.