ताज्या घडामोडी

नांदगाव ला सकल मराठा बांधवांचे साखळी आमरण उपोषण स्थगित

सरकार ला २जानेवारी पर्यंत आल्टीमेट

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव ता.०४ मराठा आरक्षणासाठी मागील नऊ दिवसांपासून आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी गुरुवारी ता.०२ रोजी अखेर आपले उपोषण मागे घेतले असून साखळी उपोषण सुरूच ठेवले आहे. नांदगावलाही मराठा आरक्षणाचा मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समानार्थी सकल मराठा समाज व मराठा महासंघ च्या वतीने २२ अक्टोंबर पासून सुरू असलेले साखळी उपोषण व आमरण उपोषण उपोषणकर्ते मनोज जरांगे- पाटील यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी (ता. ३) बेमुदत उपोषण स्थगित करण्यात आले

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत २५ ऑक्टोबर रोजी बेमुदत उपोषण सुरू केले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार नांदगाव शहरातील जुन्या तहसील कचेरी समोरील मराठा महासंघातर्फे शांततेत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या तेराव्या दिवशी शुक्रवारी ता. ०३ रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार डॉ सिध्दार्थ मोरे, पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी उपोषणस्थळी येत उपोषणकर्ते मराठा महासंघचे जिल्हाध्यक्ष भास्कर झालटे, तालुकाध्यक्ष भीमराज लोखंडे, तालुका कार्याध्यक्ष विशाल वडघुले विष्णू चव्हाण यांच्याशी सकारात्मक चर्चा

केली व उपोषण मागे घेण्याची विनंती केली
उपोषणकर्ते यांनी तहसीलदार डॉ सिध्दार्थ मोरे पोलिस निरीक्षक प्रितम चोधरी यांच्या हस्ते फळांचा जूस घेत • आपले उपोषण २ जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले यावेळी तालुक्यातील अखिल भारतीय मराठा महासंघ कार्यकते व सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.