ताज्या घडामोडी

नांदगाव तालुका दुष्काळाबाबतच्या संबधी सचिवांसह महसूल आयुक्तांची भेट घेणार :- माजी आमदार अँड अनिल आहेर

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव,ता ४ दुष्काळासारख्या प्रश्नावर तालुकास्तरीय प्रशासनाकडून काम करतांना राहून गेलेल्या त्रुटीमुळे नांदगावचा शासनाने जाहीर केलेल्या यादीत समावेश झाला नसेल तर ते गंभीरच असल्याने याबाबतीत काँग्रेसच्या वतीने मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव तसेच नाशिकच्या महसूल आयुक्तांची भेट घेऊन हे सर्व त्यांच्या पुढ्यात मांडणार असल्याची माहिती काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार अँड अनिल आहेर यांनी दिली

दुष्काळ जाहीर करण्यासंबंधी प्रशासकीय स्तरावर असलेली चौकट व त्याचे संकेत लक्षात घेता ग्राउंड लेव्हलवर पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याचा पार्श्वभूमीवर नेमके कुठली भौगालिक नैसर्गिक चित्र आहे हे ओळखून काम करण्याची कार्यालयीन प्रथा सर्वार्थाने रूढ असते असे सांगताना माजी आमदार अँड अनिल आहेर यांनी त्यांच्या कार्यकाळात दुष्काळ कसा जाहीर केला जातो याची माहिती दिली आम्ही एक महिन्यापूर्वी जेव्हा प्रशासनाने प्राथमिक नजर आणेवारी घोषित केली तेव्हाच काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांना लेखी पत्र देत घोषित झालेली आणेवारी साठी ग्राम समित्या व त्यांच्या कामाबद्दल लेखी माहिती मागितली होती शिवाय उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे यांची भेट त्यांचेही या आणेवारीबाबत लक्ष वेधले होते अशी माहिती अँड आहेर यांनी दिली दोन दिवसापासून गावनिहाय समित्यांच्या याद्या बनविणे व शेतकऱ्यांचा शोध घेणे म्हणजे वरती मागून घोडे असाच काहीसा प्रकार अनुभवायला मिळत असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार गटाचे ) तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे व त्यांच्या सहकाऱ्यानी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.